राज्यात ५३१६० वीजग्राहकांनी घेतला ‘मिस्ड कॉल’ सेवेचा लाभ 

कोल्हापूर : वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. यामध्ये गेल्या २३ दिवसांत राज्यातील ५३१६० वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’ तर १५८३ वीजग्राहकांनी ‘एसएमएस’ सुविधेचा वापर करीत वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
53160 consumers in the state availed the benefit of 'Missed Call' service
53160 consumers in the state availed the benefit of 'Missed Call' service
Published on
Updated on

कोल्हापूर : वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी वीजग्राहकांना मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ची सोय महावितरणने नुकतीच उपलब्ध करून दिली. यामध्ये गेल्या २३ दिवसांत राज्यातील ५३१६० वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’ तर १५८३ वीजग्राहकांनी ‘एसएमएस’ सुविधेचा वापर करीत वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. 

आधुनिक जीवनाशी सुसंगत व अत्यंत सुलभ सेवा देण्यासाठी महावितरणने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत गेल्या एप्रिलमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार नोंदविण्यासाठी मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’ व ‘एसएमएस’ अशी सहज सुविधा वीजग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 'लॉकडाऊन' सुरू असल्याने ही सेवा वीजग्राहकांसाठी अत्यंत सोयीची ठरत आहे. 

गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या अनेक भागात वादळी व मुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे. वादळामुळे झाडे किंवा झाडांच्या फांद्या वीजयंत्रणेवर कोसळल्याने अनेक भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होत आहे. या स्थितीमुळे गेल्या २३ दिवसांत राज्यभरात वीजपुरवठा खंडित झाल्याच्या एकूण १ लाख ३९ हजार ७५१ तक्रारी महावितरणचे मोबाईल अॅप, वेबसाईट, टोल फ्री क्रमांक आदींद्वारे प्राप्त झाल्या. यापैकी ३८ टक्के म्हणजे तब्बल ५३१६० तक्रारी वीजग्राहकांनी ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून तर १५८३ तक्रारी 

‘एसएमएस’ द्वारे नोंदविलेल्या आहेत मोबाईलद्वारे ‘मिस्ड कॉल’च्या सुविधेचा वापर करून तक्रार नोंदविणाऱ्या वीजग्राहकांची संख्या पुढीलप्रमाणे. कल्याण परिमंडलमधील १०९२१, पुणे परिमंडल – ८७०४, भांडूप- ५४२६, नागपूर- ४८५२, नाशिक- ३९३९, कोल्हापूर- ३७०१, बारामती- २४२४, जळगाव- १६०९, औरंगाबाद- २०१४, अकोला- २५५५, अमरावती- १८०५, चंद्रपूर- ८२२, कोकण- ७८५, नांदेड- १४६६, गोंदिया- ७२५ आणि लातूर परिमंडलमधील १४१२ तक्रारींचा समावेश आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com