45 lakh tonnes of fertilizer sanctioned for kharif in the state
45 lakh tonnes of fertilizer sanctioned for kharif in the state

राज्यात खरिपासाठी ४५ लाख टन खतसाठा मंजूर

खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये युरिया १५ लाख ५० हजार टन, डीएपी ५ लाख ७० हजार टन, पोटॅश (एमओपी) ३ लाख टन, संयुक्त खते (एनपीके) १४ लाख टन आणि सिंगल सुपर फॉस्फेट ७ लाख टन या खतांचा समावेश आहे.

परभणी ः राज्याला यंदाच्या (२०२२) खरीप हंगामासाठी विविध ग्रेडचा ४५ लाख २० हजार टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये युरिया १५ लाख ५० हजार टन, डीएपी ५ लाख ७० हजार टन, पोटॅश (एमओपी) ३ लाख टन, संयुक्त खते (एनपीके) १४ लाख टन आणि सिंगल सुपर फॉस्फेट ७ लाख टन या खतांचा समावेश आहे.

खरीप हंगाम २०२२ साठी केंद्र शासनाने २८ फेब्रुवारी रोजी विभागीय खत परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये राज्याला खतसाठा मंजूर करण्यात आला. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी हा खतसाठा मंजूर करण्यात आला. जिल्हानिहाय, महिनानिहाय खत साठा मंजूर करण्यासाठी मागील तीन खरीप हंगामातील खतांची विक्री विचारात घेण्यात आलेली आहे. 

जिल्हानिहाय खतसाठा मंजूर करताना खरीप हंगाम २०१९ ते २०२१ मधील जिल्हानिहाय खतांचा वापर विचारात घेण्यात आलेला आहे. या तीन  हंगामांपैकी ज्या हंगामात खत वापर जास्त आहे आणि राज्याचा एकूण मंजूर खतसाठा याचे गुणोत्तर विचारात घेऊन जिल्हानिहाय खतसाठा मंजूर करण्यात आलेला आहे. 

खताचा वापर करताना नत्र, स्फुरद, पालाश (एनपीके) आदर्श गुणोत्तर ४:२:१ राहील याची दक्षता घ्यावी. त्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचना कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हापरिषदांचे कृषी विकास अधिकारी यांना केल्या आहेत.

खरीप हंगाम २०२२ महिनानिहाय मंजूर खतसाठा (टनांमध्ये) 
महिना युरिया डीएपी पोटॅश संयुक्त खते सुपर फॉस्फेट एकूण
एप्रिल २०१५०० ७४१०० ३९००० १८२००० ९१००० ५८७६००
मे २४८००० ९१२०० ४८००० २२४००० ११२००० ७२३२००
जून ३४१००० १२५४०० ६६००० ३०८००० १५४००० ९९४४००
जुलै ३२५५०० १२९७०० ६३००० २९४००० १४७००० ९४९२००
ऑगस्ट २४८००० ९१२०० ४८०० २३४००० ११२००० ७२३२००
सप्टेंबर १८६००० ६८४०० ३६६०० १६८००० ८४००० ५४२४००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com