अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटप

यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५ टक्क्यांवर पोचली आहे. दुसरीकडे या हंगामासाठी पीक कर्जाचेही ४९ टक्के वितरण पूर्ण झाले आहे.रब्बीसाठी आतापर्यंत २९ कोटी ६० लाखांचे पीककर्ज वाटप झाले आहे.
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटप 29 crore loan for rabbi in Akola
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटप 29 crore loan for rabbi in Akola

अकोला : यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५ टक्क्यांवर पोचली आहे. दुसरीकडे या हंगामासाठी पीक कर्जाचेही ४९ टक्के वितरण पूर्ण झाले आहे. हंगाम पूर्ण होईपर्यंत पीक कर्ज वाटपाचा लक्ष्यांक साध्य झालेला असेल, असा दावा यंत्रणांकडून केला जात आहे. रब्बीसाठी आतापर्यंत २९ कोटी ६० लाखांचे पीककर्ज वाटप झाले आहे.     यंदाच्या रब्बी हंगामासाठी नियोजनानुसार साडेसात हजार शेतकऱ्यांना ६० कोटी रुपये वितरित करायचे आहेत. बँकांनी ऑक्टोबरपासून आतापर्यंत २९ कोटी ६० लाख रुपये वितरित केले आहेत. ही रक्कम ३ हजार २०० शेतकऱ्यांनी आतापर्यंत उचलली आहे. पीककर्ज वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू असल्याने हंगाम अखेरपर्यंत हे उद्दिष्टे पूर्ण होऊ शकेल, असा विश्‍वास लिड बँकेचे व्यवस्थापक आलोक ताराणीया यांनी व्यक्त केला.

६५ टक्के क्षेत्र पेरणीखाली जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे रब्बीसाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप चांगला झालेला नसतानाही शेतकऱ्यांनी तडजोड करून रब्बीसाठी पैसा उभा करीत पेरणी केली. प्रामुख्याने खरिपात शेतकऱ्यांना सर्वच पिकापासून नुकसान झाले आहे. मूग, उडीद ही पिके पूर्णपणे हातातून गेली आहेत. सोयाबीन, कपाशीची उत्पादकता जेमतेम राहिली. खरिपातील हे नुकसान रब्बीत भरून काढण्याच्या उद्देशाने शेतकरी लागवडीकडे वळाला आहे. रब्बीसाठी पैसे नसतानाही शेतकऱ्यांनी तडजोडी करून हंगामाची तयारी केली. यंदा पेरणीसाठी बी-बियाणे, खते, मशागत हा खर्च अनेकांना डोईजड बनलेला आहे. खरिपात आधीच पीक कर्ज घेतलेल्यांना थकीत असल्याने पुन्हा रब्बीसाठी पैसा उभा करणे अडचणीचे जात आहे. तरीही जिद्दीने शेतकरी लागवडीसाठी पुढे आलेला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने आजवर झालेल्‍या पेरणीचा अंदाज घेता हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून आला असून, सर्वाधिक ६१ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तुलनेने गहू १० हजार ४९२ हेक्टरवर लागवड झाला आहे.

असे झाले पीककर्ज वाटप    

  • शेतकरी    ३२०६
  • रक्कम    २९.६० कोटी
  • लक्ष्यांक    ७५ कोटी
  • टक्केवारी    ४९
  • पेरणी झालेले पीकनिहाय क्षेत्र    

  • ज्वारी    ४५३ हेक्टर
  • गहू    १००४९२
  • हरभरा    ६१३०८
  • एकूण सरासरी    १०७९७६
  • पेरणी झालेले क्षेत्र    ७४९५५
  • टक्केवारी    ६४.९१  
  • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
    Agrowon
    agrowon.esakal.com