अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत २६ टक्‍के सोयाबीन पेरणी

अमरावती ः पुरेशा पावसाअभावी अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात २६ टक्‍के क्षेत्रावरील अपवाद वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पेरणी अवघी २ ते ९ टक्‍क्‍यांपर्यंतच झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी कोणतीही जोखीम पत्कारायला घेण्याच्या स्थितीत नाहीत परिणामी पेरणीकरिता अनेक शेतकऱ्यांनी पावसाची वाट पाहण्याचे ठरविले आहे.
26% soybean sowing in five districts of Amravati division
26% soybean sowing in five districts of Amravati division
Published on
Updated on

अमरावती ः पुरेशा पावसाअभावी अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यात २६ टक्‍के क्षेत्रावरील अपवाद वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पेरणी अवघी २ ते ९ टक्‍क्‍यांपर्यंतच झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी कोणतीही जोखीम पत्कारायला घेण्याच्या स्थितीत नाहीत परिणामी पेरणीकरिता अनेक शेतकऱ्यांनी पावसाची वाट पाहण्याचे ठरविले आहे.

बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ९१ हजार ११ हेक्‍टर इतके सोयाबीनखालील सरासरी क्षेत्र आहे. त्यापैकी २५ हजार २६७ हेक्‍टरवर पेरणी झाली असून याची टक्‍केवारी अवघी सहा आहे. अकोला जिल्ह्यात २ लाख १८ हजार ८८६ हेक्‍टर क्षेत्र सोयाबीनचे असून, त्यापैकी ४३ हजार १५ हेक्‍टर म्हणजेच अवघ्या दोन टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

वाशीम जिल्ह्यात तीन लाख चार हजार १८ हेक्‍टर पैकी २८ हजार ९० हेक्‍टरवर पेरणी झाली असून ही टक्‍केवारी ९ आहे. अमरावती जिल्ह्यात २ लाख ९४ हजार २३८ हेक्‍टरपैकी ९ हजार ९५ हेक्‍टरवर पेरणी झाल्याचे सांगण्यात आले.

यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ७६ हजार ८३७ पैकी ७२ हजार ९७४ हेक्‍टरवर पेरणी झाली. या जिल्ह्यात सर्वाधिक २६ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. अमरावती विभागात सोयाबीनखाली १४ लाख ९९ हजार ५९० इतके क्षेत्र असून, त्यापैकी सुमारे १ लाख ३१ हजार ६३९ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे. अमरावती विभागाची सोयाबीनची पेरणी सरासरी ९ टक्‍के इतकी आहे.

अमरावती विभागात कापूस लागवड सरासरी (कंसात प्रत्यक्ष लागवड)
बुलडाणा

१ लाख ६८ हजार ८७९ (२६ हजार ८१६)

अकोला १ लाख ५५ हजार ६८७ (४ हजार ११६)
वाशीम १ लाख ९२ हजार ४६ (६ हजार ६९)
अमरावती २ लाख ४ हजार १९ (२५ हजार ४९)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com