‘किसान सन्मान’मधून २२.७५ कोटींचा लाभ

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत दहावा हप्ता म्हणून १,१३,७७८ रुपये जमा झाले असून, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २२,७५,५६,००० रुपये जमा करण्यात आले आहेत.
22.75 crore profit from 'Kisan Sanman'
22.75 crore profit from 'Kisan Sanman'

अमरावती ः प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत दहावा हप्ता म्हणून १,१३,७७८ रुपये जमा झाले असून, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २२,७५,५६,००० रुपये जमा करण्यात आले आहेत. यापुढील काळात किसान सन्मानाचा निधी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन केवायसी सक्‍तीची करण्यात आली आहे.  प्रधानमंत्री किसान सन्मान योजना २०१९ पासून सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपये दिले जातात. हंगामात निविष्ठा खरेदी किंवा इतर कामासाठी या पैशाचा उपयोग शेतकरी करतात. ज्यांच्या नावे सात-बारा आहे, असे शेतकरी याकरिता पात्र ठरतात. या योजनेसाठी ३,३८,४२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. पहिल्या हप्त्याचा लाभ ३,२४,८२१ शेतकऱ्यांना मिळाला. त्यानंतर अपात्र शेतकऱ्यांची नावे कमी करण्यात आल्याने लाभार्भी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली आहे. त्यानुसार आता १,१३,७७८ शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जात आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यात दहाव्या हप्त्यापोटी २२,७५,५६,००० रुपये जमा करण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांना दहा हप्त्यात निधी वाटप  किसान सन्मान निधी योजनेअंतर्गंत ३,३८,४२९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यानुसार पहिला हप्ता ३,२४,८२१ शेतकऱ्यांना, दुसरा हप्ता ३,१९,९९२, तिसरा ३,२१,०८२, चौथा ३,१२,६३७, पाचवा ३,०६,७७१, सहावा २,८९,१८७, सातवा २,७०,९८६, आठवा २,१५,३१९, नववा १,९२,७१९ व दहावा हप्ता १,१३,७७८ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com