मराठवाड्यात दोन कोटी ११ लाख टन उसाचे गाळप

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ५९ कारखाने यंदा ऊस गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. या कारखान्यांनी सहा मार्चपर्यंत २ कोटी १० लाख ८० हजार ५६८ टन उसाचे गाळप केले. तर २ कोटी १० लाख ५७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
2 crore 11 lakh tons of sugarcane crushed in Marathwada
2 crore 11 lakh tons of sugarcane crushed in Marathwada
Published on
Updated on

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ५९ कारखाने यंदा ऊस गाळप हंगामात सहभागी झाले आहेत. या कारखान्यांनी सहा मार्चपर्यंत २ कोटी १० लाख ८० हजार ५६८ टन उसाचे गाळप केले. तर २ कोटी १० लाख ५७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड व उस्मानाबाद वगळता सर्वच जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपुढे राहिला आहे.

यंदाच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्‍न चांगलाच ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे अनेक कारखाने क्षमतेच्या पुढे जाऊन उसाचे गाळप करत आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तोडणीला उशीर झाल्यामुळे उभ्या उसाला तुरे फुटल्याचेही चित्र आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील १३ साखर कारखान्यांनी ४९ लाख १० हजार ९२५ टन उसाचे गाळप केले. ९.५० टक्के साखर उताऱ्याने ४६ लाख ६६ हजार ५९५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. लातूर जिल्ह्यातील १० कारखान्यांनी ३७ लाख ३५ हजार ३१३ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.६९ टक्के साखर उताऱ्याने ३९ लाख ९३ हजार ५८० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी १८ लाख ८७ हजार १०५ टन उसाचे गाळप करून १९ लाख ३९ हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. 

जालना जिल्ह्यातील ५ कारखान्यांनी १७ लाख ९३ हजार ५५३ टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.१९ टक्के साखर उताऱ्याने १८ लाख २६ हजार ९९० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ७ कारखान्यांनी २७ लाख ४८ हजार ६८० टन उसाचे गाळप केले. 

हिंगोलीत १५ लाख ३७ हजार टन गाळप 

हिंगोली जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांनी १५ लाख ३७ हजार ७९७ टन उसाचे गाळप करताना १०.३१ टक्के सरासरी साखर उतारा राखला. तर १५ लाख ८५ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. नांदेड जिल्ह्यातील ६ कारखान्यांनी १७ लाख ६९ हजार ९३४ टन उसाचे गाळप करत सरासरी ९.८० टक्के साखर उताऱ्याने १७ लाख ३५ हजार ३३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतल्याची माहिती साखर विभागातील सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com