जायकवाडी धरण भरण्याच्या उंबरठ्यावर

जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ९६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे.पाणलोट क्षेत्रात जोराचा पाऊस झाल्यासजलसंपदा विभागाकडून प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय होऊ शकतो.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

औरंगाबाद  ः जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ९६ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोराचा पाऊस झाल्यास कोणत्याही क्षणी जलसंपदा विभागाकडून प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय होऊ शकतो. त्यामुळे प्रकल्पाखाली गावांना सतर्क राहण्याच्या सूचना द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधितांना दिले. 

जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा बुधवारी (ता.२) दुपारी ९४.८३ टक्क्यांवर पोहोचला. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी श्री. चव्हाण म्हणाले, बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत जायकवाडी प्रकल्पातील पाणी पातळी ९४.८३ टक्‍क्‍यांवर आहे. मंजूर धरण प्रचलन आराखड्यानुसार धरणांमध्ये यापुढे ठराविक पाणीसाठा करता येऊ शकणार आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोराचा पाऊस झाल्यास धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पाहून कोणत्याही क्षणी नदीपात्रामध्ये पाणी सोडण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाकडून होऊ शकते. त्यामुळे धरणाखालील सर्व गावांना सतर्कतेच्या सूचना द्या.’’ 

जायकवाडी प्रकल्पात नगर, नाशिक जिल्ह्यातील प्रकल्पातून होणाऱ्या पाण्याचा विसर्गामुळे बुधवारी सकाळी १८,६११ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. बुधवारी सायंकाळी ही आवक ८७८७ वर पोहोचली. गुरुवारी (ता.३) सकाळी सहा वाजता पुन्हा या आवकेत वाढ होऊन ती १२,४४३ वर पोहोचली. गुरुवारी सायंकाळी उपयुक्त पाणीसाठा ९६ टक्क्यांवर गेला असून उजव्या कालव्याव्दारे २०० क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

धरणातील आवकेकडे लक्ष वरच्या भागातील प्रकल्पांमधून होणारा पाण्याचा विसर्ग पाहता जायकवाडीमधील पाणीसाठा झपाट्याने वाढतो आहे. गुरुवारी दुपारनंतर प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची तयारी करावी का, या विषयी हालचाल सुरू होती. आवक अशीच कायम राहिली आणि प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ९६ टक्क्यांपुढे गेला तर जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता जायकवाडी प्रकल्पाच्या सूत्रांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com