मंगेशने घेतलाय बेडूक संवर्धनाचा वसा...

पुणे ः ‘‘परसबागेत बेडकांचे संवर्धन करतोय म्हणून चेष्टेचा विषय झालेला मंगेश आज बेडकांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजातींचा संवर्धक म्हणून ओळखला जातोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले निसर्गतज्ज्ञ डॉ. वरद गिरी मंगेशच्या परसबागेत बेडकांच्या नोंदी घेण्यासाठी येतात, हे पर्यावरण आणि बेडकांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे...
परसबागेत बेडकांसाठी तयार केलेले डबके.
परसबागेत बेडकांसाठी तयार केलेले डबके.
Published on
Updated on

पुणे ः ‘‘परसबागेत बेडकांचे संवर्धन करतोय म्हणून चेष्टेचा विषय झालेला मंगेश आज बेडकांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजातींचा संवर्धक म्हणून ओळखला जातोय. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले निसर्गतज्ज्ञ डॉ. वरद गिरी मंगेशच्या परसबागेत बेडकांच्या नोंदी घेण्यासाठी येतात, हे पर्यावरण आणि बेडकांच्या संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल ठरलं आहे... ही गोष्ट आहे होडावडे (ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग) गावात शेती, कुक्कुटपालन, शेळीपालनात रमलेल्या मंगेश सुहास माणगावकर या कृषी पदाविधारकाची. पावसाळ्यात शेती, डबक्यांमध्ये दिसणारा बेडूक हा कीडनियंत्रण करणारा शेतकऱ्यांचा मित्र. परंतु भात शेतीत रासायनिक खते आणि कीडनाशकांचा अनियंत्रित वापर, तसेच काही कारणांमुळे बेडकांच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु गेल्या १५ वर्षांपासून दुर्लक्षित बेडकांच्या संवर्धनात मंगेश रमला आहे. होडावडे येथील मंगेशच्या परसबागेतील चार डबक्यांत बेडकांच्या आठ प्रजाती नांदताहेत. काही लुप्त होणाऱ्या प्रजाती देखील येथे पाहावयास मिळतात. नैसर्गिक पद्धतीचा अधिवास असल्याने बेडकांची संख्या दरवर्षी वाढताना दिसते.

नैसर्गिक अधिवासात बेडकांचे संवर्धन...

  • बेडूक संवर्धनाबाबत मंगेश म्हणाला, की वडील आणि मला पहिल्यापासून निसर्गाची आवड. मी १९९७ मध्ये दापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयातून बी.एस्सी. वनशास्त्र पदवी घेऊन होडावडे गावी परतलो. गाव परिसरात काही वर्षे कृषी सल्लागार म्हणून काम केले. सध्या कुक्कुटपालन, शेळीपालन आणि गांडूळ खतनिर्मिती उद्योगामध्ये रमलो आहे. पण हे करत असताना घराच्या परिसरात पक्ष्यांच्या निवाऱ्यासाठी घरटी बांधली. विविध फुलझाडे लावली. त्याचबरोबरीने परसबागेत नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या चार डबक्यात २००६ पासून बेडकांच्या चार प्रजातींचे संवर्धन करतोय. भात शेतीमध्ये कीडनियंत्रणात महत्त्वपूर्ण सहभाग असलेला बेडूक रासायनिक खते, कीडनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे दुर्मीळ होत आहे. निसर्गसाखळीत महत्त्वपूर्ण दुवा असणाऱ्या बेडकांचे संवर्धन ही कृषी पदवीधर म्हणून माझी जबाबदारी समजतो. या उपक्रमात आई-वडील तसेच पत्नी श्रिया, मुलगा यश यांचीही चांगली साथ मिळाली आहे.
  • आम्ही कोकणात जरी असलो, तरी गाव परिसरात मार्चनंतर पाणीटंचाई असते. परंतु परसबागेतील चार डबक्यात मी वर्षभर पाणी साठवत असल्याने गेल्या दहा वर्षांत बेडकांच्या चार प्रजाती स्थिरावल्या आहेत. त्यांना खाद्य म्हणून  माशांचे तुकडे, कोंबडी खाद्य डबक्यात टाकतो. तसेच हे बेडूक मुक्तपणे परसबागेत फिरून  खाद्य शोधतात. 
  • परिसरात बेडूक असणे हे त्या भागात रसायनविरहित चांगली नैसर्गिक परिसंस्था असल्याची खूण आहे. दरवर्षी एखादी नवी प्रजात देखील 
  • या डबक्यात दिसते. डॉ. वरद गिरी, काका भिसे, डॉ.योगेश कोळी या तज्ज्ञांच्या मदतीने मी बेडकांच्या शास्त्रीय नोंदी ठेवतो. दरवर्षी पावसाळ्यात माझ्या परसबागेत बेडकांच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ मंडळी येतात.
  • शेतीमध्ये कीड नियंत्रणासाठी बेडकांचे संवर्धन शेतकऱ्यांनी केले पाहिजेत. संवर्धनातून नष्ट होत चाललेल्या प्रजाती वाचविणे हे आपले काम आहे. बेडकांच्या प्रजननाचे अधिवास नष्ट न करता नैसर्गिकरीत्या त्यांचे संवर्धन करण्याचा विडा मंगेशने उचलला आहे. या प्रयत्नांना प्राणिप्रेमी तसेच वन्य अभ्यासकांची चांगली साथ मिळू लागली आहे. 
  •   परसबागेत ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ मंगेशच्या परसबागेत दरवर्षी इंडियन बुल फ्रॉग, फंगाईड फ्रॉग, नॅरो माउथ फ्रॉग, मलबार ग्लायडिंग फ्रॉग, स्कीटरिंग फ्रॉग, बलून फ्रॉग, कॉमन ट्री फ्रॉग, कॉमन टोड या बेडकाच्या प्रजाती दिसतात. गेल्या सहा वर्षांपासून मंगेशच्या परसबागेतील डबक्यात पश्‍चिम घाटात प्रदेशनिष्ट असलेली ‘मलबार ग्लायडिंग फ्रॉग’ ही प्रजाती  दिसते. हा बेडूक डबक्याच्या वर असणाऱ्या झाडांवर फोमनेस्ट करून त्यात अंडी घालतो. काही दिवसांनी अंड्यातून बाहेर आलेली पिले पानांवरून थेट डबक्यात उडी मारतात. दुर्मीळ होत चाललेल्या बेडकांच्या संवर्धनासाठी मंगेशने डबक्याच्या शेजारी जास्वंद, समई, चिकूची झाडे लावली आहेत. आता बेडकाची ही प्रजाती या झाडांवर फोमनेस्ट बनविते. त्यामुळे दरवर्षी या प्रजातींच्या बेडकांची संख्या वाढत आहे. - मंगेश माणगावकर,  ७४९८६२१२३५  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com