कुकडी कारखान्याची निवडणूक बिनविरोध

नगर ः श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणातील प्रत्येक बाब प्रतिष्ठेची, अशातही येथील माजी आमदार राहुल जगताप यांनी कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली आहे
election
election

नगर ः श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणातील प्रत्येक बाब प्रतिष्ठेची, अशातही येथील माजी आमदार राहुल जगताप यांनी कुकडी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली आहे. विरोधी नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत निवडणूक बिनविरोध केली असली, तरी तरुणाचे आकर्षण असलेल्या राहुल जगताप यांनी राजकारणातील प्रगल्भता दाखवून दिली आहे. दोन सहकारी व दोन खासगी साखर कारखाने असलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील राजकारण सातत्याने राज्य पातळीवर चर्चेत असते. माजी आमदार व साखर संघाचे माजी अध्यक्ष स्व. शिवाजीराव नागवडे, लोकनेते स्व. कुंडलीकराव जगताप यांच्यासह माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, माजी आमदार राहुल जगताप, घनशाम शेलार, बाबासाहेब भोस, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नहाटा, दिनकर पंधरकर अशी मात्तबर मंडळी या तालुक्यात. पूर्वीच्या नगर मतदार संघातील काही गावे श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात असल्याने नगर तालुक्यातील नेत्यांचेही श्रीगोंद्यावर लक्ष असते. सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना व कुकडी सहकारी साखर कारखाना या दोन कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. कुकडी कारखाना निवडणुकीत २१ जागांसाठी १४८ अर्ज दाखल झाले होते. सेवा संस्था मतदारसंघातून डॉ. प्रणोती जगताप या पूर्वीच बिनविरोध विजयी झाल्या. कुकडीतील प्रमुख विरोधक असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर यांनी निवडणूक लढणार अशी घोषणा केली होती. मात्र त्यांनी सहकार व कारखान्याला मदत व्हावी म्हणून निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनीही अर्ज काढून घेतले. या सगळ्या प्रक्रियेत राहुल जगताप यांनी अतिशय शांतपणे यंत्रणा हाताळली. शेवटी २१ जागांसाठी एकवीसच अर्ज राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात माजी आमदार राहुल जगताप, डॉ. प्रणोती राहुल जगताप, निवृत्ती वाखारे, विजय शिर्के, सुभाष राक्षे, विवेक पवार, संभाजी देवीकर, अशोक वाखारे, मोहन आढाव, मनोहर शिंदे, कचरुजी मोरे, प्रमोद इथापे, मच्छिंद्र नलगे, जालिंदर निंभोरे, अशोक शितोळे, बाळासाहेब उगले, आबासाहेब शिंदे, अनिता लगड, विमल मांडगे, मोहन कुदांडे, संपत कोळपे यांचा समावेश आहे. राहुल जगताप यांची प्रगल्भता राहुल जगताप हे अत्यंत कमी वयात जिल्हा परिषद सदस्य असताना आमदार झाले होते. आजही श्रीगोंदा तालुक्यातील तरुणांत ते लोकप्रिय आहेत. कुकडी कारखान्याच्या निवडणुकीत स्व. कुडलिंकराव जगताप नसताना ही निवडणूक हाताळताना सुरुवातीला निवडणुकीत मोठी चुरस होईल, असे वाटत होते. मात्र राहुल जगताप यांनी निवडणूक बिनविरोध करताना विरोधी गटाला एकही जागा न देता ही लढाई एकहाती जिंकली. त्यातूनच त्यांची राजकीय परिपक्वता सिद्ध झाली. ‘‘आता तात्या हवे होते, त्यांच्या कष्टाचे हे फळ आहे,’’ अशी भावना राहुल जगताप यांनी व्यक्त केली आहे.}  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com