यावल, जि.जळगाव : मधुकर कारखाना  २५ वर्ष भाडेतत्त्वावर देणार : देवकर

यावल, जि.जळगाव : फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे जिल्हा बँकेची ५८ कोटी रुपयांची थकबाकी असून, सदरची थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँक कारखाना २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देणार आहे.
Yaval, Dist. Jalgaon: Madhukar factory will be leased for 25 years: Deokar
Yaval, Dist. Jalgaon: Madhukar factory will be leased for 25 years: Deokar

यावल, जि.जळगाव : फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्याकडे जिल्हा बँकेची ५८ कोटी रुपयांची थकबाकी असून, सदरची थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँक कारखाना २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देणार आहे. त्यामुळे या वर्षी साखर कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू करणार असल्याचा निर्धार जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी येथे व्यक्त केला.  तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखांचे अधिकारी, कर्मचारी, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे गटसचिव यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्या सत्काराचा कार्यक्रम जिल्हा बँकेच्या येथील शाखेत पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, विनोदकुमार पाटील, तुषार पाटील, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, उपाध्यक्ष श्यामकांत सोनवणे, संचालक विनोदकुमार पाटील यांचा सत्कार विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत करण्यात आला. देवकर म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेत सध्या पिककर्जाचा एनपीए ४२ टक्के असून इतर कर्जाचा ८ टक्के आहे. बँकेची आर्थिक स्थिती चांगली असली तरी केवळ एनपीएमुळे आपला ऑडिट वर्ग ‘ब’ आहे. त्याला ‘अ’ मध्ये आणण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाने वसुलीसंदर्भात कठोर निर्णय घेतले आहेत. यात येथील जे. टी. महाजन सहकारी सूतगिरणीकडे सुमारे १० ते १२ कोटी रुपये अडकून पडले आहेत. गिरणी दहा- बारा वर्षांपासून बंद असल्यामुळे मशिनरी खराब झाली. त्यामुळे कोणी गिरणी चालविण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे गिरणी विक्रीसंदर्भात निर्णय झाला असून येणाऱ्या काळात गिरणी विक्रीचे टेंडर निघेल.’’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव विजयसिंग पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा बँकेच्या विभागीय शाखेचे व्यवस्थापक अनिल महाजन, शाखा व्यवस्थापक विनोद देशमुख, सुधीर भंगाळे, गणेश बुरुजवाले यांच्यासह सेवक वर्गाचे सहकार्य लाभले.  दरवर्षी किमान पाच, सहा कोटी  गेल्या चार-पाच वर्षांपासून अडचणीत असलेला मधुकर सहकारी साखर कारखाना जिल्हा बँक ताब्यात घेऊन २५ वर्ष भाडे कराराने चालविण्यास देईल. यातून दरवर्षी किमान पाच, सहा कोटी रुपये जिल्हा बँकेस वसूल मिळेल. पंधरा वर्षात संपूर्ण वसुली मिळाल्यानंतर उर्वरित कालावधीचे पेमेंट कारखान्याच्या संचालक मंडळास दिले जाईल. भाडेकरारनामा संपल्यानंतर कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात येईल, असे नियोजन असल्याचे सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com