सोलापूर ः राज्यातील शंभर सर्वाधिक कृषिपंप थकबाकीदारांकडे ९.२८ कोटी थकीत 

सोलापूर ः राज्यातील शेतीपंपांची थकबाकी ४२ हजार कोटी रुपयांवर पोहोचली असून, त्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या शंभर व्यक्ती आणि संस्थांकडे ९.२८ कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे.
Chinawal, Dist. Jalgaon: Types of cable theft increased in Shet Shivara
Chinawal, Dist. Jalgaon: Types of cable theft increased in Shet Shivara

सोलापूर ः राज्यातील शेतीपंपांची थकबाकी ४२ हजार कोटी रुपयांवर पोहोचली असून, त्यात सर्वाधिक थकबाकी असलेल्या शंभर व्यक्ती आणि संस्थांकडे ९.२८ कोटींहून अधिक रक्कम थकीत आहे. राज्यातील सर्वाधिक कृषिपंप थकबाकी ही पुणे जिल्ह्यातील सायगाव येथील सुभकांत पंढरीनाथ काळे यांच्याकडे आहे. तर त्यांच्यासह शंभर जणांच्या या यादीत सोलापुरातील १६ जणांचा समावेश आहे. 

राज्यातील ३६ पैकी १२ जिल्ह्यांत सर्वाधिक थकबाकी असलेल्या १०० व्यक्ती आणि संस्था असून, त्यांच्याकडे एकूण ९ कोटी २८ लाख ९० हजार ६०० रुपये इतकी थकबाकी जमा आहे. १०० पैकी सर्वाधिक ३२ थकबाकीदार हे अहमदनगर जिल्ह्यातील, त्यानंतर २१ थकबाकीदार हे पुणे जिल्ह्यातील तर १६ थकबाकीदार हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. रोख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साखरेच्या पट्ट्यातील ६ जिल्ह्यांत १०० पैकी सर्वाधिक ८१ थकबाकीदार आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात २, बीड जिल्ह्यात एक, नांदेड जिल्ह्यात १० असे १०० सर्वाधिक थकबाकीदारांपैकी एकूण १३ थकबाकीदार आहेत. विदर्भात नागपूर व अमरावती जिल्ह्यात प्रत्येकी एक असे केवळ दोन थकबाकीदार या यादीत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात ४ थकबाकीदार आहेत.  टॅापटेन यादीतही चौघे  शंभर जणांच्या या यादीत पुन्हा टॅाप टेन म्हणजे त्यातून सर्वाधिक दहा थकबाकीदारांची नावे काढण्यात आली आहेत. या ग्राहकांकडे सुमारे एक कोटी ५७ लाख २२ हजार २०० रुपये थकीत आहेत. त्यात सोलापुरातील चौघांचा समावेश आहे. त्यात मेसर्स जयंत वाटर (आढेगाव- टेंभूर्णी, ता. माढा) यांच्याकडे १३ लाख ४८ हजार ७६० रुपये, श्री. चैवूनय भैरवनाथ (केडगाव, जेऊर उपविभाग, ता. करमाळा) यांच्याकडे १३ लाख ३९ हजार ५० रुपये, सौ. गुणाबाई नामदेवर पवार (इस्लामपूर, ता. माळशिरस) यांच्याकडे १० लाख ५० हजार ७४० रुपये आणि संत सावता माळी पाणीपुरवठा संस्था (अकोले, टेंभुर्णी उपविभाग, ता. माढा) यांच्याकडे १० लाख ३४ हजार २० रुपये अशी थकबाकी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com