सोलापूर ः नीरा कालव्याच्या  विविध कामांना ६४ कोटींचा निधी 

सोलापूर ः सांगोला तालुक्यातील नीरा उजवा कालव्याच्या बंदिस्त पाइपलाइनसह विविध कामांसाठी ६४.१२ कोटी निधी मंजूर झाला आहे.
Solapur: Fund of Rs. 64 crore for various works of Nira canal
Solapur: Fund of Rs. 64 crore for various works of Nira canal

सोलापूर ः सांगोला तालुक्यातील नीरा उजवा कालव्याच्या बंदिस्त पाइपलाइनसह विविध कामांसाठी ६४.१२ कोटी निधी मंजूर झाला आहे. या कामांची निविदा प्रसिद्ध झाली असून, लवकरच ती कामेही निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुरू केली जातील. 

आमदार शहाजी पाटील यांनी या कामासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेल्या या कामासाठी भरीव निधी मिळाल्याचे सांगण्यात आले. सांगोला तालुक्यात नीरा उजवा कालव्याच्या बंदिस्त पाइपलाइनचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. सांगोला शाखा कालवा किमी ८५ ते ९९ (मूळ कि. मी. ८५ ते १०३) मधील बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची पीडीएनची व भाग एकच्या लाभक्षेत्र विकासाची कामे करणे, पाच वर्षांकरिता देखभाल दुरुस्ती व परिचलन करणे या कामासाठी २८ कोटी ९४ लाख रुपये. सांगोला शाखा कालवा वितरिका क्र. १६ ते २७ अ व थेट विमोचक ८ ते १४ वरील उर्वरित बंदिस्त नलिका वितरण प्रणाली भाग एकच्या लाभ क्षेत्र विकासाची कामे, यासाठी देखभाल दुरुस्तीसाठी १७ कोटी ३९ लाख रुपये. सांगोला शाखा कालवा वितरिका क्र. ८ ब ते १५ साठी पाच १२ कोटी १८ लाख रुपये, सांगोला शाखा कालवा प्रकल्पांतर्गत सांगोला शाखा कालव्यावरील किमी ३० ते ८४ मधील १० कामांची बांधकामे करणे ३ कोटी १२ लाख रुपये, सांगोला शाखा कालवा प्रकल्पांतर्गत नीरा उजवा कालव्यावरील कमान मोरी क्र. १४ चे मजबुतीकरण करून संधारणाच्या अस्तरीकरण करण्यासाठी २ कोटी ४७ लाख रुपये याप्रमाणे हा निधी खर्च होणार आहे.  बारा गावच्या सिंचनाचा प्रश्‍न सुटणार  नीरा उजवा कालवा आणि त्याअंतर्गत होणाऱ्य़ा या कामामुळे तालुक्यातील आलेगाव, मेडशिंगी, वाढेगाव, सावे, यलमार मंगेवाडी, अजनाळे, चिणके, अंनकढाळ, वाटंबरे, अकोला, कडलास, जवळा या गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com