सोलापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस 

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.३) पहाटे दीडच्या सुमारास मान्सुनोत्तर पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे आधीच्या दोन दिवसातील पावसाने झालेल्या नुकसानीत आणखीनच भर पडली
Rain for third day in a row in Solapur district
Rain for third day in a row in Solapur district
Published on
Updated on

सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता.३) पहाटे दीडच्या सुमारास मान्सुनोत्तर पावसाने पुन्हा हजेरी लावली. त्यामुळे आधीच्या दोन दिवसातील पावसाने झालेल्या नुकसानीत आणखीनच भर पडली. त्यानंतरही दिवसभर जिल्ह्यातील बहुतेक सर्व भागात कधी ढगाळ, कधी ऊन असे वातावरण राहिले.  गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा मान्सुनोत्तर पाऊस होतो आहे. शुक्रवारी पुन्हा पहाटे दीडच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा ते पाऊणतास त्याची रिपरिप सुरु होती. या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याशिवाय ऊस तोडणी व वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत सूर्यदर्शन झाले नव्हते. शुक्रवारी पुन्हा तीच परिस्थिती होती. सांगोला, पंढरपूर, मोहोळ, माढा, माळशिरस भागातील द्राक्ष, डाळिंब बागांमध्ये या पावसाने पाणी साठून राहिले. डाळिंबाच्या काढणी अवस्थेतील बागांच्या कामात व्यत्यय आला. त्याशिवाय मोहोळ, बार्शी, उत्तर सोलापूर, करमाळा भागातील कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. ढगाळ हवामानासह पावसामुळे डाळिंबावर डाग पडून प्रतवारी खालावणार आहे. तर द्राक्षांच्या घडांवर डाऊनीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्याशिवाय भाजीपाला पीकेही खराब झाली आहेत. परिणामी, बाजार पडण्याची शक्यता आहे. नुकसानीचा नेमका आकडा किती हे अद्याप समोर आले नसले, तरी प्रशासनाकडून त्यासंबंधी सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.  ऊसतोड मजुर उघड्यावर  जिल्ह्यात सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू आहे. पण गेल्या दोन-तीन दिवसांपासून सलगच्या पावसामुळे ऊसतोडणीवर परिणाम झाला आहे. तोडलेला ऊस वाहनांत भरता न आल्याने वाहतूकही खोळंबली. अचानकपणे आलेल्या पावसामुळे कारखान्यावरील ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे भर पावसात मजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत. विशेषतः लहान मुले आणि महिलांचे हाल होत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com