नाशिकच्या स्वयंम पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 

नाशिक: जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा प्रकारातील स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून स्वयंम पाटील यांस गौरविण्यात आले आहे.
Prime Minister's National Child Award to Swayam Patil of Nashik
Prime Minister's National Child Award to Swayam Patil of Nashik
Published on
Updated on

 नाशिक: जिल्ह्यातील स्वयंम पाटील याने क्रिडा प्रकारातील स्विमिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून स्वयंम पाटील यांस गौरविण्यात आले आहे.                  जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार (ता.२४) दूरदृष्यपप्रणालीद्वारे आयोजित ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२’ वितरण कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी दूरदृष्यपप्रणालीद्वारे उपस्थित होत्या. तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे, उपायुक्त महिला व बालविकास चंद्रशेखर पगारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ पुरस्कार प्राप्त स्वयंम पाटील यांची आई विद्या पाटील व वडील विलास पाटील आदी उपस्थित होते.           देशातील २९ मुलांना आज प्रातिनिधीक स्वरूपात दूरदृयश्प्रणालीद्वारे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील स्वयंम पाटील या १४ वर्षीय बालकाने  एलिफंट गुफा ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किलोमीटर खाडी ४ तास ९ मिनिटांत पोहून पार केल्याचा विक्रम स्वयंम पाटीलने केला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने त्यास क्रीडा क्षेत्रातील प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२२ देवून सन्मानित केले. यावर्षी प्रथमच कानपूर आयआयटीमार्फत ब्लॉकचेन माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भ्रमणध्‍वनीवर डिजिटल प्रमाणपत्र व एक लाख रुपये रोख रक्कम पुरस्कार प्राप्त स्वयंम पाटील यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.    स्वयंम पाटील यास यापूर्वी देखील लिमका बुक ऑफ रेकॉर्ड २०१७, दिव्यांगजन सशक्तीकरण हेतू राष्ट्रीय पुरस्कार २०१८, वंडर बुक ऑफ इंटरनॅशनल रेकॉर्ड २०१८, जिल्हा क्रीडा पुरस्कार २०२० तसेच वर्ल्डस् रेकॉर्ड इंडिया अशा पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com