नाशिक : शेतकऱ्यांना सक्षम व उत्पादनक्षम बनविणार : कृषीमंत्री भुसे

नाशिक : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील मालेगावमधील १२५ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली, ही अतिशय आनंदाची बाब आहे.
Nashik: Farmers will be made capable and productive: Agriculture Minister Bhuse
Nashik: Farmers will be made capable and productive: Agriculture Minister Bhuse

नाशिक : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील मालेगावमधील १२५ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली, ही अतिशय आनंदाची बाब आहे. या अभियानातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांच्या माध्यमातून सक्षम व उत्पादनक्षम बनविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील,’’ असे  कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले. 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेच्या अनुषंगाने शुक्रवार(ता.११) रोजी ऑनलाईन पद्धतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्रालयातून दुरदृश्यप्रणालीद्वारे भुसे बोलत होते. यावेळी  कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नाशिक जिल्हाधिकारी गंगाथरन डी., विभागीय कृषी सहसंचालक संजय पडवळ, तंत्र अधिकारी जितेंद्र शाह, दिलीप देवरे, राजेंद्र निकम, रमेश शिंदे, विजय कोळेकर तसेच मालेगाव तालुक्यातील १४१ गावातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, तलाठी तसेच सदस्यही या बैठकीस दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होते. 

यावेळी बोलतांना भुसे म्हणाले, ‘‘ पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन व तंत्रज्ञानावर आधारित सुक्ष्म नियोजन तसेच वेळोवेळी गावपातळीवर शेतकऱ्यांना शेतीच्या विविध योजना लाभ मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसभेचेही आयोजन करण्यात येणार आहे.गाव केंद्र घटक मानून कृषि व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणीकरीता लोकसहभागातून नियोजन करण्यात येणार आहे. तसेच पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी,जमिनी आरोग्य व्यवस्थापन, नवीन तंत्रज्ञान,कृषि व्यवसाय आणि शेतकऱ्यांची क्षमता बांधणी या बाबींवर भर देण्यात येणार आहे. शेतीक्षेत्रात महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी लक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक प्रकल्प गावात कृषिताईचे सातबाऱ्यावर नामनिर्देशन करण्याकरीता कोणतेही पैसे न घेता अर्ज केल्यापासून १५ दिवसाच्या आत उताऱ्यावर नाव लावण्यात येणार आहे.’’  प्रकल्पातील मुद्दे असे:  -प्रकल्पातील गावांमध्ये वैयक्तिक लाभासाठीच्या योजनांकरिता २ हेक्टरपर्यंत जमीन धारकांना ७५ टक्के आणि २.५ हेक्टर जमीनधारकांना ६५ टक्के अनुदान -महिलांना पिकांवरील किडी रोगाची ओळख व नियंत्रण करण्यासाठी शेतीशाळा आणि कौशल्य प्रशिक्षण  -शेती व्यवसायाबरोबर पुरक व्यवसाय करण्यासाठी,जैविक व सेंद्रीय खतांची निर्मिती करण्यासाठी अणि फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन  -प्रकल्पांतर्गत विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी समितीची स्थापना   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com