मोहोळ, जि. सोलापूर ः मोहोळ तालुक्यात अद्यापही  दोन लाख टन ऊस शिल्लक 

मोहोळ, जि. सोलापूर ः मोहोळ तालुक्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, भीमा, लोकनेते, जकराया व आष्टी शुगर या चार साखर कारखान्यांनी यंदा २१ लाख १६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून २० लाख १३ हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे.
Mohol, Dist. Solapur: Two lakh tonnes of sugarcane still remains in Mohol taluka
Mohol, Dist. Solapur: Two lakh tonnes of sugarcane still remains in Mohol taluka

मोहोळ, जि. सोलापूर ः मोहोळ तालुक्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, भीमा, लोकनेते, जकराया व आष्टी शुगर या चार साखर कारखान्यांनी यंदा २१ लाख १६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून २० लाख १३ हजार पोती साखरेचे उत्पादन केले आहे. असे असले तरी आजही सुमारे दोन लाख टन ऊस तालुक्यात शिल्लक आहे. 

गेल्या चार महिन्यांपूर्वी कारखाने सुरू झाले. चालू वर्षी पाऊस काळ चांगला झाल्याने सुरुवातीला उसाचे एकरी वजन वाढले, मात्र उसातील पाणी न हाटल्याने उसाला तुरे आले. त्यामुळे उसाच्या पेऱ्यात पोकळी निर्माण होऊन वजनात पुन्हा मोठी घट झाली. त्यात भरीस भर म्हणून उंदरांनीही मोठे नुकसान केले आहे. गेल्या महिन्याभरापासून कडक ऊन पडू लागल्याने ऊसतोडणी टोळ्यांचा दम कमी झाला आहे. पहाटे लवकर उठून जाऊन दुपारपर्यंत ऊस तोडतात व तो भरून देतात, त्यामुळे ऊस वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. चालू वर्षी पाऊस जादा झाल्याने उसात निरोपयोगी गवत मोठ्या वाढले आहे. त्यामुळे ते गवत ऊसतोडणीस अडथळा ठरत आहे. त्यासाठी ऊस जाळून तोडला जात आहे. दुसरीकडे ऊसतोड करणाऱ्या टोळ्याही जादा पैशांची मागणी करत आहेत. कारखानदारही त्याबाबत लक्ष न घालता हात वर करत आहेत. या सगळ्यात मात्र ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढले आहे  लोकनेते शुगरची आघाडी  यंदा भीमा साखर कारखान्याने ४ लाख ५८ हजार ६७५ टन गाळप केले आहे, तर ४ लाख ३२ हजार ७०० पोती साखर उत्पादन केले आहे. जकराया शुगरने ४ लाख ५० हजार टन उसाचे गाळप केले आहे, तर ३ लाख ८८ हजार साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. आष्टी शुगरने ४ लाख ६७ हजार २५५ टन उसाचे गाळप करून ४ लाख ३७ हजार साखर पोती उत्पादन केले आहे. तर लोकनेते शुगरने ७ लाख ४० हजार टन गाळप केले आहे, तर ७ लाख ५५ हजार पोती साखर उत्पादन केले आहे. यात लोकनेते शुगरने गाळप आणि साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com