औरंगाबाद : औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत १८ हजार हेक्टरवर उन्हाळी सोयाबीन 

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत १८ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर यंदा उन्हाळी सोयाबीनला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
Aurangabad: Summer soybeans spread over 18,000 hectares in Aurangabad, Jalna and Beed districts
Aurangabad: Summer soybeans spread over 18,000 hectares in Aurangabad, Jalna and Beed districts

औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत १८ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर यंदा उन्हाळी सोयाबीनला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. कुठे फुले तर कुठे शेंगा पक्वतेच्या अवस्थेत पीक आहे. 

बियाण्याच्या उपलब्धतेसाठी अलीकडे उन्हाळी सोयाबीन घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. खरिपात पारंपरिकरीत्या सोयाबीनचे पीक घेणारे शेतकरी आता लेट रब्बी व उन्हाळी सोयाबीनही मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी उन्हाळी हंगामात जालना जिल्ह्यात ८५० हेक्टरवर असलेले सोयाबीन यंदा जिल्ह्यात तब्बल ८२०६ हेक्टरवर घेतले गेले आहे. यामध्ये जालना तालुक्यात ५७६ हेक्टर, बदनापूर ६८२, भोकरदन १४८२, जाफराबाद ६११, अंबड २०५६, मंठा ८१७, घनसावंगी १४०८ तर परतूर तालुक्यातील ५७४ हेक्टरवरील सोयाबीन पिकाचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील ११ तालुक्यांपैकी केज, परळी, माजलगाव व पाटोदा या तालुक्यांचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत तब्बल ७९५० हेक्टरवर शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनला पसंती दिली आहे. पेरणी झालेल्या सोयाबीन क्षेत्रात बीड तालुक्यातील १४१७ हेक्टर, आष्टी २२२, शिरूर ८००, गेवराई ३४१७, धारूर ८००, वडवणी ४५१, तर अंबाजोगाई तालुक्यातील ८४३ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.  उन्हाळी सोयाबीनवर खोडकिडीचा प्रादुर्भाव  औरंगाबाद : विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र औरंगाबाद आणि तालुका कृषी अधिकारी फुलंब्री यांच्या वतीने मंगळवारी (ता १५)जिल्हा मासिक चर्चासत्र अंतर्गत क्षेत्रीय पाहणी करण्यात आली. या वेळी वानेगाव येथील उन्हाळी सोयाबीन पिकाची पाहणी तज्ज्ञांनी केली असता काही झाडे ही शेंड्याकडे वाळत असल्याची दिसली. त्या झाडाचे निरीक्षण घेतले असता झाडाच्या बुडात खोडकिडीने शिरकाव करत झाडाचा खोडाचा आतील भाग काळसर झालेला होता. त्यामुळे ही झाडे सुकून गेली असल्याचे लक्षात आले. त्याच सोबत काही सोयाबीन पीक दोन महिन्यांचे होऊनही फुले लागली नाहीत अशा प्रकारच्या समस्या उन्हाळी सोयाबीन पिकावर आढळून आल्या. जिल्ह्यातील इतर काही ठिकाणीही अशाच प्रकारे प्रादुर्भाव आढळून आल्याने यासाठी डॉ. एस. बी. पवार यांनी उपाय सुचविले. त्यानुसार खोडकिडीसाठी थायमिथाकझॅम अधिक लॅम्बडासायहॅलोथ्रिन २.५ मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ज्या ठिकाणी फुले अद्यापही लागली नसतील त्या क्षेत्रावर ०:५२:३४ एक टक्का म्हणजे १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिश्रण करत फवारणी करावी, असा सल्ला डॉ. पवार यांनी दिला.  .  यंदा पहिल्यांदाच दीड एकरात सोयाबीनचे पीक घेतले. जोडओळ पद्धतीने घेतलेले पीक सध्या जोमदार असून, अजून फुले लागणे बाकी आहे.  - रवींद्र जाधव, नळणी, बु, ता. भोकरदन, जि. जालना 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com