
वारणावती, जि. सांगली : चांदोली धरणात (Chandoli Dam) सध्या २०.१४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १.०८ टीएमसी साठा कमी झाला आहे. तरीही धरणातील उपलब्ध साठ्याचा विचार करता पुढील हंगामात पावसाचे आगमन उशिरा झाले, तरी टंचाई भासणार नसल्याचे सध्या तरी चित्र आहे.
चांदोली धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी (TMC) आहे. दरवर्षी धरण १०० टक्के भरते. याही वर्षी धरण १०० टक्के भरले होते. सध्या धरणात २०.१४ टीएमसी (TMC) साठा शिल्लक आहे. सध्या धरणाची पातळी ६१०.५० मीटर इतकी आहे. सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातून एक हजार ४७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू आहे. ऑक्टोबर ते मार्चअखेर सहा महिन्यांत १४.२६ टीएमसी (TMC) साठा संपला आहे. यावरून प्रत्येक महिन्याला साधारण २.३७ टीएमसी पाण्याचा वापर होत असल्याचे स्पष्ट होते.
आता उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार आहे. त्यामुळे महिन्याला तीन टीएमसी पाणी सोडले, तरी सहा टीएमसी (TMC) पाणी संपेल. मे अखेरपर्यंत धरणात कमीत कमी १४ टीएमसी पाणी (Water) शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने या पाण्याचा अंदाज घेऊन टंचाई भासणार नाही व धरण तळही गाठणार नाही, अशा पद्धतीने नियोजन करण्याची गरज आहे.
या वर्षी धरण प्रशासनाच्या नेटक्या नियोजनामुळे सिंचनासाठी व औद्योगिक कारणांसाठी ३० जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात सध्या उपलब्ध आहे.
टी. एस. धामणकर,शाखाधिकारी, वारणा पाटबंधारे, वारणावती
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.