पुणे विमानतळाचा होणार विस्तार; १३ एकर जमीन देण्यावर सहमती

पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या विस्तारासाठी संरक्षण खात्याची १३ एकर जागा मिळाली आहे. याची घोषणा मिळाल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी (ता.७) केली.
Pune Airport
Pune Airport

पुणे - पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या विस्तारासाठी संरक्षण खात्याची (Ministry Of Defence) १३ एकर जागा (Thirteen Acre Land) मिळाली आहे. याची घोषणा मिळाल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी सोमवारी (ता.७) केली. या घोषणेमुळे विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या रखडलेल्या कामाला वेग मिळणार आहे.

I am very happy to announce that Ministry of Defence has approved to allot 13 acres of adjacent land of BSO yard to Airports Authority of India for construction of International and Domestic cargo infrastructure at Pune Airport.

— Nitin Gadkari (@nitin_gadkari)

विमानतळावरील कार्गो पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला (Airports Authority of India) पुणे हवाई दलाच्या (Air Force) बॅरॅक स्टोअर ऑफिसची १३ एकर जमीन देण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली आहे. हवाई दलाने जागा दिल्यामुळे त्यांना देशातील अन्य शहरात तेरा एकर जागा देणे किंवा त्या जागेच्या किमतीची रक्कम देणे, असा तोडगा काढण्यात आला आहे. हवाई दलाने तो मान्य केल्याची माहिती गडकरींना दिली. 

२०१७-१८ मध्ये ही कल्पना पहिल्यांदा मांडण्यात आली होती. तेव्हापासून संरक्षण मंत्रालयाकडे यासाठी पाठपुरावा केला जात होता. गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेला हा प्रस्ताव अखेर मार्गी लागला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालयाच्या त्याबाबत वारंवार बैठकाही झाल्या होत्या. गेल्यावर्षी गडकरी पुण्याच्या दौऱ्यावर आले असता म्हणाले होते की, संरक्षण खात्याने पुणे विमानतळाला जागा देण्याचे मान्य केले असून त्या बदल्यात त्यांना चंदीगडमध्ये हवी ती जमीन देण्यात यावी.  

लोहगाव विमानतळावर सध्या १० विमाने उभी राहतील, एवढी क्षमता आहे. त्यात आता भरघोस वाढ होईल १३ एकर जागेतील २.५ एकर जागा कार्गोसाठी वापरता येणार आहे. तसेच प्रवाशांची ये-जा करण्याचीही क्षमता वाढणार आहे. यामुळे भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष संजीवसिंग, लोहगाव विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

अशी असेल पुढची वाटचाल

डिफेन्स इस्टेट आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांची आता संयुक्त बैठक होईल. त्या बैठकीतून जागा विमानतळाकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया ठरेल. त्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरण सुधारित आराखडा तयार करेल आणि निविदा काढून कामाला प्रारंभ होईल.

पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया आता वेगाने पुढे जाईल. अनेक वर्षे रखडलेला हा प्रस्ताव मार्गी लागल्याने पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण नितीन गडकरी यांचे आभार मानत आहे.

- संतोष ढोके (संचालक, लोहगाव विमानतळ)  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com