‘आत्मनिर्भर’ भारत करतोय सुपारीची आयात !

देशाच्या सुपारी उत्पादनाची मागणी पूर्ण करता येण्याजोगे सुपारी उत्पादनात देशात होतं. असं असताना सिंगापूर, नेपाळ या सुपारी उत्पादनासाठी ओळखल्या न जाणाऱ्या देशांमधून सुपारी आयात कशी काय करण्यात आली ? सुपारी उत्पादनात आत्मनिर्भर असलेल्या भारताला बाहेरील देशांमधून सुपारी आयात करण्याची गरज का भासावी?
 ‘Atma Nirbhar’ India imports Areca Nuts.
‘Atma Nirbhar’ India imports Areca Nuts.

देशाच्या सुपारी उत्पादनाची मागणी पूर्ण करता येण्याजोगे सुपारी उत्पादनात देशात होतं. असं असताना सिंगापूर, नेपाळ या सुपारी उत्पादनासाठी ओळखल्या न जाणाऱ्या देशांमधून सुपारी आयात कशी काय करण्यात आली ? सुपारी उत्पादनात आत्मनिर्भर असलेल्या भारताला बाहेरील देशांमधून सुपारी आयात करण्याची गरज का भासावी? असा खडा सवाल कॅम्पकोचे ( Arecanut and Cocoa Marketing and Processing Cooperative) अध्यक्ष किशोर कुमार कोडगी यांनी उपस्थित केलाय.

हेही पाहा-श्वान पालन करताय मग हे पाहा

भारताने सौदी अरब अमिरात आणि सिंगापूरमधून सुपारीची आयात केली असल्याची माहिती सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीमुळे उघड झाली आहे. दक्षिण कन्नड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी एन. के. कटील यांनी लोकसभेत उपस्थित याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय उद्योग व वाणिज्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी,  २०२०-२०२१ मध्ये भारताचं सुपारी उत्पादन १५.६३ लाख टन असल्याचं सांगितलं. तसंच भारताने ५०८.५९ कोटी रुपयांची २३, ९८८ टन सुपारी आयात केल्याचंही सांगितलं. 

२०२१-२०२२ च्या पहिल्या दहा महिन्यात भारताची सुपारी आयात १७,८९० टनांवर गेली असून भारताने त्यासाठी ४६८.१२ कोटी रुपये मोजलेत. ही आयात सौदी अरब अमिरात आणि सिंगापूरमधून करण्यात आलीय. या दोन देशांशिवाय भारताने श्रीलंकेतून २८३ कोटींची (९०७६ टन), इंडोनेशियातून ८४.२१ कोटींची (४८८५ टन), मलेशियातून ५.८३ कोटींची  (२२ टन) आणि नेपाळमधून ३.०७ कोटींची  (१२० टन) सुपारी आयात केल्याची माहिती मंत्री पटेल यांनी दिलीय.   

या पार्श्वभूमीवर देशात सुपारीचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होत असताना बाहेरून मागवण्यात आलेल्या सुपारीमुळे देशांतर्गत बाजारातील भाव दबावात आल्याची तक्रार कोडगी यांनी बिझनेस लाईनशी बोलताना व्यक्त केलीय. 

स्वस्त दरात आयात केलेल्या मालाचा फटका देशांतर्गत उत्पादनाच्या बाजारावर होतो. त्यामुळे अशा आयातीला मनाई करायला हवी, असा आग्रहही कोडगी यांनी धरला आहे. एकीकडे पंतप्रधान सर्व क्षेत्रात आत्मनिर्भरतेची साद घालत आहेत. मग सुपारीची देशांतर्गत गरज भरवण्यात देश आत्मनिर्भर असताना अशी आयात का करण्यात येते? असा सवालही कोडगी यांनी उपस्थित केलाय. 

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com