Turmeric Farming :सध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. पावसाळी हंगामात हळद पिकाची शाकीय वाढ होत होण्याबरोबरच खोड व फुटवे यांची वाढ होत असते. हळदीचे गड्डे तयार होण्यासाठी हा योग्य काळ आहे. वातावरणात आर्द्रतेचे अधिक प्रमाण, ढगाळ, उबदार वातावरणामध्ये हळद पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. रोगांच्या प्रादुर्भावामुळे गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर अनिष्ठ परिणाम होतो. हे टाळण्यासाठी रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.
कंदकुज (गड्डाकुज) कंदकूज म्हणजेच रायझोम रॉट हा रोग फ्युजारिअम, पिथिअम, फायटोप्थोरा, रायझोक्टोनिया या बुरशींमुळे होताना दिसतो. या बुरशीजन्य रोगामुळे हळद पिकाचे ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत नुकसान होते. लक्षणे ः कंदाच्या कोवळ्या फुटव्यावर रोगाची लक्षणे लगेच दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्याची पाने पिवळसर रंगाची होतात व वाळू लागतात. खोडाचा गड्ड्यालगतचा रंग तपकिरी काळपट होतो. प्रादुर्भावग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढल्यास तो पचपचीत व मऊ लागतो, त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडत असते. या रोगाच्या वाढीसाठी भरपूर पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन पोषक ठरते. जास्त आर्द्रता, ढगाळ उबदार हवामानामध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. नियंत्रण :
प्रतिबंधात्मक उपाय ट्रायकोडर्मा प्लस भुकटी प्रति एकरी २ ते २.५ किलो या प्रमाणात २५० ते ३०० किलो शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरवून द्यावी.
बुंध्याभोवती आळवणी प्रति लीटर पाणी
कॉपर ऑक्सिक्लोराइड ५ ग्रॅम किंवा बोर्डो मिश्रण १ टक्के
रोगाची तीव्रता जास्त असल्यास, आळवणी प्रति लीटर
पानांवरील ठिपके (करपा/लीफ स्पॉट) करपा हा बुरशीजन्य रोग असून, कोलेटोट्रिकम कॅपसिसी बुरशीमुळे होतो. वातावरणात सकाळी पडणारे धुके व दव असताना या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये रोगाची तीव्रता जास्त असते. ढगाळ व पावसाळी हवामान रोग प्रसारास अनुकूल असते. लक्षणे ः अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके प्रथमत: खालील पानावर पडतात. पान सूर्याकडे धरून पाहिल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पान करपते, वाळून गळून पडते. संपूर्ण पीक वाळलेले दिसते, अशा परिस्थितीत उत्पादनात मोठी घट होते. या बुरशीचे बिजाणू प्रादुर्भावित हळदीच्या कंदामध्ये व अन्य अवशेषात वाढतात. नियंत्रण :
पानांवरील ठिपके (लीफ ब्लॅच) ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये वातावरणातील आर्द्रता ८० टक्के आणि तापमान २१-२३ अंश सेल्सिअस असते, त्या वेळी या रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागतो. टॅफ्रिना मॅक्युलन्स या बुरशीमुळे होणाऱ्या या रोगामध्ये पानांवर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके तयार होतात. पुढे ते वाढत जाऊन संपूर्ण पान करपते. पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजून लालसर करडया रंगाचे १ मे २ सें. मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात. रोगाची सुरुवात जमिनीलगतच्या पानांवर होऊन नंतर रोग वरील पानांवर पसरतो. हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात. हे ठिपके फुलांवरसुद्धा आढळतात. नियंत्रण :
ः ०२३३-२४३७२७४ : डॉ. मनोज माळी, (प्रभारी अधिकारी) ९४०३७ ७३६१४ : डॉ. सचिन महाजन, (वनस्पती रोग शास्त्रज्ञ) ९४२११ २८३३३ (कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.