व्यापारी तत्त्वावर लागवड करण्यासाठी उष्ण व दमट हवामान तसेच विरळ सावली चांगली मानवते. अतिथंडी तसेच अति उष्णता पिकाला सहन होत नाही. अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित ‘पन्नीयुर-१’ या जातीची लागवड करावी. या जातीची प्रति वेल २-२.५ किलो उत्पादन मिळते. लागवडीच्या तिसऱ्या वर्षांपासून प्रत्येक वेलास २० किलो शेणखत, ५०० ग्रॅम मिश्रखत (१५:१५:१५) द्यावे. वर्षातून दोन वेळा खत मात्रा विभागून द्यावी. पहिला हप्ता सप्टेंबर, दुसरा हप्ता जानेवारी महिन्यात द्यावा. काळी मिरी घडातील एक दोन फळे तांबडी लाल होताच संपूर्ण घड काढावा. देठविरहित फळे बांबूच्या करंडीत अथवा टोपलीत किंवा कापडी पिशवीत भरून उकळत्या पाण्यात एक मिनिटे बुडवावीत. नंतर उन्हामध्ये वाळवावीत. उकळत्या पाण्याची प्रक्रिया केल्याने मिरीला गर्द काळा रंग येतो. पांढरी मिरी
घडामधील जास्तीत जास्त फळे पिवळसर लाल झाल्यावर काढणी करावी. देठविरहित फळे १५ ते २० मिनिटे वाफेवर किंवा उकळत्या पाण्यामध्ये ठेवावीत. त्यामुळे फळांवरील साल मऊ होते. हाताने किंवा फडक्यामध्ये चोळून साल काढावीत.स्वच्छ पाण्याने धुऊन बिया उन्हामध्ये वाळवाव्यात. वाळवणी करताना एक किलो काळी मिरीसाठी १० ते १५ ग्रॅम ब्लिचिंग पावडर चोळल्याने पांढरा शुभ्र रंग येतो. अन्यथा मिरी मळकट रंगाची दिसते. दाणे पक्व झाल्यावर ते तांबूस होण्यापूर्वी काढणी करावी. हिरवे दाणे १५ ते २० टक्के मिठाच्या द्रावणात ठेवून डब्यामध्ये किंवा बाटलीमध्ये सीलबंद करावेत. जायफळापासून जायफळ व जायपत्री असे दोन मसाल्याचे पदार्थ मिळतात. हे उष्णकटिबंधीय पीक आहे. समुद्रसपाटीपासून १००० मीटर उंचीपर्यंत पावसाची व्यवस्थित विभागणी असेल अशा १५०० ते ३००० मि.मी. पर्यंत पाऊस पडणाऱ्या प्रदेशात चांगले येते. पिकास वर्षभर ७० ते ९५ टक्के आर्द्रता आवश्यक असते. पिकाला सावली आवश्यक असल्याने ते नारळ सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून घ्यावे. लागवडीनंतर दहाव्या वर्षापासून सुमारे ५०० फळे प्रति वर्षी मिळतात. या जातीच्या एकाच झाडांवर नर व मादी फुले येतात. त्यामुळे परागी भवनासाठी स्वतंत्र नर झाडे लावावी लागत नाहीत. ही जायफळाची मादी जात असून, प्रतिवर्षी सरासरी ७५० फळे दहाव्या वर्षापासून मिळतात. बी मध्यम आकाराची असून वजन सुमारे ५ ग्रॅम (ताजे बी) असते. जायपत्री सुमारे १.२ ग्रॅम मिळते. या जातीची लागवड करताना नर कलम किंवा रोपांची लागवड करणे जरुरीचे आहे. कोकण श्रीमंती : या मादी झाडापासून सुमारे ५०० फळे दहाव्या वर्षापासून मिळतात. बियांचे वजन १० ग्रॅम (सुके) असून जायपत्रीचे वजन सुमारे २ ग्रॅम (सुके) आहे. कोकण संयुक्ता ः
लागवडीनंतर दहाव्या वर्षांपासून सुमारे ५०० ते ७५० फळे प्रति वर्षी मिळतात. बीचा आकार मोठा आहे. लागवड : लागवड नारळ किंवा सुपारीच्या बागेत सावलीत करावी. लागवड चार नारळाच्या मध्यभागी करावी. पाणी व्यवस्थापन ः जमिनीच्या मगदुरानुसार हिवाळ्यात ७ ते ८ दिवसांनी आणि उन्हाळ्यात ३ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे. खते ः
पहिल्या वर्षी १० किलो शेणखत / कंपोस्ट खत, ५० ग्रॅम नत्र (१०० ग्रॅम युरिया) २५ ग्रॅम स्फुरद (१५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) आणि १०० ग्रॅम पालाश (२०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) ही खते द्यावीत. खताची मात्रा दरवर्षी वाढवावी. दहा वर्षांनंतरच्या प्रत्येक झाडास ५० किलो शेणखत /कंपोस्ट खत, ५०० ग्रॅम नत्र (१ किलो युरिया), २५० ग्रॅम स्फुरद (१.५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) १ किलो पालाश (२ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) द्यावे. पूर्ण पक्व झालेल्या फळांचा रंग पिवळा होतो. टरफलास देठाच्या विरुद्ध बाजूस तडा जातो. तयार फळे झाडावरून काढावीत किंवा जमिनीवर पडल्यास गोळा करावीत. टरफले गोळा करून जायपत्री अलगद काढावी. जायपत्री ६ ते ८ दिवस आणि जायफळे १५ दिवसांत वाळतात. या झाडाचा प्रत्येक भाग उपयुक्त असून, झाडाची साल दालचिनी आणि पानांचा तमालपत्र म्हणून उपयोग होतो. कोवळ्या फळांचा उपयोग मसाल्यामध्ये ‘काळा नागकेशर’ म्हणून करतात. हे उष्ण कटिबंधीय प्रदेशातील झाड असून, दमट हवामान चांगले मानवते. या जातीपासून प्रति वर्षी २५० ग्रॅम दालचिनी आणि अर्धा किलो तमालपत्र मिळते. या जातीपासून पानांचे अधिक उत्पादन (१.६० किलो / झाड) मिळते. पानातील तेलाचे प्रमाण २.८ टक्के आहे. लागवड नारळ, सुपारी बागेत सावली खाली तसेच मोकळ्या जागेतही करता येते. नारळाच्या झाडापासून २ मी. अंतर सोडून दालचिनी लागवड करावी. सलग लागवड करावयाची झाल्यास दोन ओळींत व दोन झाडांत सव्वा मीटर अंतर ठेवावे. दहा वर्षांनंतर २० किलो शेणखत किंवा कंपोस्ट, २०० ग्रॅम नत्र, १८० ग्रॅम स्फुरद आणि २५० ग्रॅम पालाश ही खते द्यावीत. ही खते दोन समान हप्त्यात ऑगस्ट-सप्टेंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी अशी विभागून द्यावीत. दालचिनीचे झाड तोडून त्यापासून साल काढावी. लागवड केल्यापासून तिसऱ्या वर्षी नोव्हेंबर ते मेच्या दरम्यान दालचिनीचे झाड खोडाचा २० सेंमी भाग ठेवून करवतीच्या साह्याने कापावे. - धारदार चाकूने छोटासा काप घेऊन साल सुटते, याची खात्री करावी. झाड तोडल्यानंतर बुंध्यावर असंख्य धुमारे फुटतात, हे धुमारे साधारण दोन वर्षांचे झाले, की काढण्यास योग्य होतात. पानांचा तमालपत्र म्हणून उपयोग होतो. संपर्क ः डॉ. वैभव शिंदे ९४२२४२५७२७, डॉ. सुनील घवाळे ९४२१३७५८७२, डॉ. संतोष वानखेडे ९७६५५४१३२२ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, जि. रत्नागिरी)