Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

India's Yellow Peas Import from Canada : डाळवर्गीय शेतीमालाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने देशांतर्गत वाटाणा आयातीवर भर देण्यात आला आहे.
Yellow Peas
Yellow PeasAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : डाळवर्गीय शेतीमालाचे दर नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने देशांतर्गत वाटाणा आयातीवर भर देण्यात आला आहे. त्यानुसार एप्रिल ते ऑक्टोंबर या कालावधीत सुमारे १२.५४ लाख टन आयात भारतात झाल्याचा दावा केला जात आहे. त्याचा तुरीसह इतर डाळवर्गीय शेतीमालाच्या दरावर परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.

निर्यात क्षेत्रातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलैपर्यंत ९.३२ लाख टन, ऑगस्टमध्ये ४३,२४०, सप्टेंबर २७,७३२, ऑक्टोबरमध्ये २.५ लाख टन या प्रमाणे आतापर्यंत सुमारे १२.५४ लाख टन वाटाणा आयात भारतात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सूत्रांच्या मते, एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत १२.५४ लाख तर डिसेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत २४.२३ लाख टन वाटाणा भारतीय बंदरावर पोहोचला.

Yellow Peas
GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

यंदा ऑगस्टपासून सुरू झालेल्या हंगामात सप्टेंबरपर्यंत कॅनडातून भारतात सुमारे ३.८७ लाख वाटाण्याची आयात करण्यात आली आहे. त्याचवेळी कॅनडातून चीनमध्ये सुमारे २.२ लाख टन आयात केली गेली.

भारतात वाटाण्याची मोठ्या प्रमाणावर आयात होत असल्याने तूर तसेच अन्य डाळवर्गीय शेतीमालाच्या मागणीत घट झाल्याचा दावा केला जात आहे. त्याचा थेट परिणाम हंगामात आवक होणाऱ्या भारतीय शेतीमालाच्या दरावर पडेल, असेही सांगितले जात आहे.

Yellow Peas
Cotton Market : ‘सीसीआय’ केंद्रावर मुहूर्ताला १४ क्‍विंटल आवक

शेतीमाल विपणन क्षेत्राचे अभ्यासक विजय जावांधिया यांनी तूर डाळीचे दर २०० रुपयांच्या पुढे गेल्यास महागाई वाढल्याची ओरड होते. अशा स्थितीत सरकारने तूर डाळीचे दर १३० ते १४० रुपयांपर्यंत नियंत्रित ठेवावेत. त्या माध्यमातून तूर उत्पादक शेतकऱ्यांना ९००० रुपयांपर्यंतचा दर देणे शक्य होणार आहे. हाच पर्याय देशांतर्गत डाळवर्गीय एकमालाचे उत्पादन वाढविण्यासाठी पूरक ठरणार आहे, असे सांगितले.

https://agrowon.esakal.com/agro-special/retail-inflation-has-reached-an-all-time-high-reaching-621-percent-in-the-last-14-months-as11
वाटाण्याचा मुख्य उत्पादक देश असलेल्या रशियात यावर्षी ३५ ते ३६ लाख टन वाटाणा उत्पादकतेचा अंदाज आहे. मात्र उत्पादित बहुतांश वाटाण्याची निर्यात चीनला केली जाण्याची शक्‍यता आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारताच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात येणार तोच आयात करायची. अशा प्रकारचे धोरण शेतीसाठी घातक आहे. सध्या ३८ ते ४० रुपये किलो दराने पिवळ्या वाटाण्याची आयात होत आहे. हा वाटाणा हरभरा डाळीत मिक्स केला जातो. त्यामुळे यापुढील काळात हरभऱ्यासह तुरीचे दर दबावात राहतील, अशी भीती आहे.
विजय जावांधिया, शेतीमाल विपणन क्षेत्राचे अभ्यासक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com