Tur Market Rate : तुरीचे भाव पुढीलवर्षभर तेजीतच राहणार? काय आहे कारण?

Tur Price : देशातील मागील खरिपातील तूर उत्पादनात मोठी घट झाल्यानंतर तुटवडा निर्माण झाला होता. मागील हंगामात देशात तूर पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.
Tur
TurAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशातील बाजारात मागील सहा महिन्यांपासून तुरीचे भाव तेजीत आहेत. चालू हंगामात देशात तुरीची लागवड घटली. तर कमी पाऊस, पावसातील मोठे खंड आणि उष्णतेमुळे उत्पादकता कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी वर्षभर तूर चांगलाच भाव खाण्याची शक्यता आहे, असे जाणकारांनी सांगितले.

देशातील मागील खरिपातील तूर उत्पादनात मोठी घट झाल्यानंतर तुटवडा निर्माण झाला होता. मागील हंगामात देशात तूर पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. परिणामी उत्पादकतेला मोठा फटका बसला. मागील हंगामात म्हणजेच २०२२-२३ च्या हंगामात देशात फक्त ३३ लाख टन तूर उत्पादन झाले होते, असे केंद्र सरकारनेही स्पष्ट केले.

Tur
Tur Stock Limit : तुरीचे स्टॉक लिमिट आता डिसेंबरपर्यंत

तर देशाची गरज ४५ लाख टनांच्या दरम्यान आहे. म्हणजेच मागणी आणि पुरवठ्यात तब्बल १२ लाख टनांची तूट होती. तर आयात ९ लाख टनांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. यायाच अर्थ असा की आयातीनंतरही देशातील मागणी पूर्ण होऊ शकत नाही.

त्यामुळेच तुरीचे भाव तेजीत आहेत. देशात २०२१-२२ च्या हंगामात ४२ लाख २० हजार टन उत्पादन झाले होते. ते यंदा ३३ लाख टनांवर स्थिरावले.

सरत्या हंगामातील राज्यनिहाय उत्पादनाचा विचार करता महाराष्ट्रात सर्वाधिक साडेतीन लाख टनांनी उत्पादन कमी राहीले. २०२१-२२ च्या हंगामात १३.९१ लाख टन तूर उत्पादन झाले होते. ते सरत्या हंगामात ९ लाख २५ हजार टनांवरच स्थिरावले.

तर कर्नाटकातील उत्पादन ११ लाख ४५ हजार टनांवरून कमी होऊन ८ लाख ५५ हजार टनांवर स्थिरावले. गुजरातमधील उत्पादन १२ हजार टनांनी तर झारखंडमधील उत्पादन ५५ हजार टनांनी घटले होते.

Tur
Tur crop : तूर पिकातील खोड करपा, मर रोगावरील उपाययोजना

यंदाही उत्पादनात घट येणार

यंदा देशात दुष्काळी स्थिती आहे. महत्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिकाला कमी पावसाचा फटका बसत आहे. तसेच यंदा तुरीची लागवडही कमी झाली. देशातील तूर लागवड जवळपास ५ टक्क्यांनी कमी आहे.

पावसातील खंड आणि वाढत्या उष्णतेमुळे पिकाची वाढ खुंटली. फुले लागण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे यंदाही तूर उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.

आयातीतूनही गरज भागणार नाही

भारताला तूर आयात करायची म्हटल्यास जागतिक पातळीवर जास्त प्रमाणात तूर उपलब्ध नसते. मागील हंगामात सरकारने पूर्ण जोर लावूनही ९ लाख टनांचीच आयात होऊ शकली. तर चालू हंगामात आयातीचा आकडाही ९ लाख टनांच्या दरम्यानच राहू शकतो, असा अंदाज आहे.

भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर जास्तीत जास्त १० लाख टन तूर मिळू शकते. त्यातच यंदाही उत्पादन कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीचे भाव आणखी वर्षभर तरी तेजीतच राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com