Anil Jadhao
मक्याला उठाव कमी झाला होता. त्यामुळे देशात सध्या मका दर काहीसे नरमले आहेत.
मक्याचा दर तेजीत असल्यानं पोल्ट्रीमध्ये तांदळाचा वापर वाढला होता. कारण तांदूळ मक्याच्या तुलनेत स्वस्त आहेत.
आता केंद्र सरकारने तुकडा तांदूळ निर्यातबंदी केली, तसचं काही तांदूळ वाणांच्या निर्यातीवर शुल्कही लावले. त्यामुळं तांदळाचे दर काहीसे कमी झाले आहेत.
यामुळं तांदळाचे दर कमी झाले. परिणामी पोल्ट्री उद्योगानं तांदळाचा वापर वाढवला आहे.
तांदळाचा वापर वाढल्याने मक्याचे दर २८०० रुपयांवरून २ हजार ५०० रुपयांपर्यंत नरमले. मागील काही दिवसांपासून हा दर कायम आहे.
सध्या मक्याला चांगली मागणी आहे. निर्यात अशीच सुरु राहील्यास मक्याचा दर २ हजार ४५० ते २ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.