Onion Procurement : नाफेडची प्रत्यक्ष कांदा खरेदी का सुरू होत नाही?

Onion Market Update : नाफेडकडून १५ मेपासूनच प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू केली जाईल, यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पत्र दिले.
Onion Subsidy
Onion SubsidyAgrowon
Published on
Updated on

Nashik News : नाफेडकडून १५ मेपासूनच प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू केली जाईल, यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पत्र दिले. याबाबत मोठा गाजावाजा झाला.

प्रत्यक्षात मात्र नाफेडकडून अजून महाराष्ट्रात कुठेही कांदा खरेदी सुरू झालेली नसून, याबाबतचा खुलासा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ई-मेलद्वारे केला आहे.

याबाबत संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी प्रसिद्धीस दिले आहे, की नाफेड कांदा खरेदीबाबत अजून कोणतीही स्पष्टता नाही. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी २ ते ६ रुपये प्रतिकिलो नीचांकी दर मिळत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने सरकारबद्दल प्रचंड संतप्त भावना आहेत. स्वतः मंत्री गोयल यांनी एप्रिल महिन्यातच नाफेडकडून या वर्षी तीन लाख टन कांदा खरेदी केली जाईल, असे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले होते.

Onion Subsidy
Onion Production : कांदा उत्पादकांचे दुःख जाणून शासनाने मदत करावी

या घोषणानंतरही प्रत्यक्ष कांदा खरेदी सुरू झालेली नाही, हे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासारखे आहे, असा आरोप करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत बघू नये.

अतिवृष्टी, गारपिटीमुळे राज्यात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सध्या कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणे मुश्कील झाले आहे.

Onion Subsidy
Onion Market : केंद्र, राज्य सरकारकडून कांदा उत्पादकांची थट्टा

अशा परिस्थितीमध्ये नाफेड कांदा खरेदी सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. ही खरेदी थेट बाजार समितीमध्ये उतरून करावी. व्यापारी खरेदी व नाफेडच्या खरेदीमध्ये स्पर्धात्मक लिलाव होऊन शेतकऱ्यांना अधिकचा दर कसा मिळेल यासाठीही मंत्री डॉ. पवार यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने म्हटले आहे.

उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचे वर्षही संपून गेले. मात्र अजूनही शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल दराने विक्री होत आहे. उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी, शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला असून, सध्या कांद्याला मिळणाऱ्या दरामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे, असे ठळकपणे मांडले आहे.

दरवर्षी नाफेडकडून साधारणतः एप्रिल महिन्यापासूनच कांद्याची खरेदी केली जाते, परंतु या वर्षी मे महिना संपत आला तरीही नाफेडची कांदा खरेदी प्रत्यक्षात सुरू झाली नाही. याला सर्वस्वी केंद्रीय मंत्रीच जबाबदार आहेत. नाफेडकडून तत्काळ शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी सुरू न झाल्यास संघटनेच्या नेतृत्वाखाली केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना घेराव घातला जाईल.
- भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com