
अमरावती : जुलै महिन्यातील अतिवृष्टीने (Heavy Rain) नुकसान सोसणाऱ्या कापूस उत्पादकांसमोर (Cotton Producer) आता किडींच्या प्रादुर्भावाचे ()Pest Outbreak On Cotton संकट उभे ठाकले आहे. गुलाबी डोमकळ्यांचे आक्रमण कपाशीवर सुरू झाल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने कीड व्यवस्थापन (Cotton Pest Management) सुचविले आहे.
अमरावती हा कापूस उत्पादकांचा जिल्हा आहे. या पिकांचे पेरणी क्षेत्र मोठे आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने कापसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. आता त्यावर किडींचे आक्रमण वाढले आहे. कापूस पिकावर सुरूवातीच्या काळात मावा, तुडतुडे व फुलकिडे या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरडवाहू कपाशीवर मावा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. तर, शेवटच्या आठवड्यात तुडतुड्यांनी आक्रमण केले आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात फुलकिड्यांनी आक्रमण करून शेतकऱ्यांना हैराण केले असतानाच गुलाबी डोमकळ्यांच्याही आक्रमणास सुरूवात झाली आहे.
कृषी विभागाने असे सुचविले कीड व्यवस्थापन...
- बीटी कपाशीच्या बियाण्यास ईमाडायक्लोप्रीड किंवा थायोमेथॉक्साम कीटकनाशकाची प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे पिकांना २ ते ३ आठवड्यांपर्यंत संरक्षण मिळते.
- या कालावधीत कीटकनाशकाची फवारणी करू नये
- वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा नष्ट करावा
- पिवळे चिकट सापळे लावावेत
- कपाशीत चवळीचे पीक घ्यावे
- आंतर मशागतीने पीक तणविरहीत ठेवावे
- अंबाडी, रानभेंडी नष्ट करावी
- सीरफिड माशी, कातीन, ढालकिडे, क्रायसोपा आढळून आल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.