Wheat Stock Limit : गव्हावरील साठा मर्यादेत ३१ मार्चपर्यंत वाढ

Wheat Market : रब्बी हंगामातील गहू बाजारात येण्यास आता पंधरा ते वीस दिवसच शिल्लक आहे. अशातच सरकारने ग्राहकांना कमी दरात याची उपलब्धता व्हावी याकरिता गव्हावरील साठवण मर्यादेवरील नियंत्रण मार्च २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
Wheat Market
Wheat MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : रब्बी हंगामातील गहू बाजारात येण्यास आता पंधरा ते वीस दिवसच शिल्लक आहे. अशातच सरकारने ग्राहकांना कमी दरात याची उपलब्धता व्हावी याकरिता गव्हावरील साठवण मर्यादेवरील नियंत्रण मार्च २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये घाऊक व्यापाऱ्यांसाठी असलेली पूर्वीची एक हजार टनाची मर्यादा कमी करुन ती २५० टन इतकी कमी करण्यात आली आहे.

ग्राहक संरक्षण व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या वतीने या संबंधीची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार देशात रब्बी २०२४ या हंगामात ११३२ लाख टन इतक्‍या गव्हाचे उत्पादन नोंदविण्यात आले. मात्र देशातील अनेक राज्यांमध्ये गव्हाची साठेबाजी करीत त्या माध्यमातून दरात कृत्रिम तेजी आणण्याचे प्रकार घडतात.

Wheat Market
Wheat Price Fall: गव्हाचे भाव पाडण्याचा सरकारचा डाव; खरेदीसाठी दर हमीभावापर्यंत कमी करण्याचा प्रयत्न

त्यावर निर्बंध म्हणून २४ जून २०२४ रोजी गव्हाच्या साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली होती. या मर्यादेत ९ सप्टेंबर तसेच ११ डिसेंबर २०२४ असे दोन वेळा संशोधन करण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा गव्हाच्या किमती नियंत्रणासाठी स्टॉक मर्यादेत ३१ मार्च २०२५ पर्यंत वाढीचे निर्देश देण्यात आले आहेत.

याची अंमलबजावणी देशातील सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाणार आहे. त्यासोबतच गव्हाच्या साठ्याविषयीची माहिती दर शुक्रवारी स्टॉक सीमा पोर्टलवर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये कुचराई करणाऱ्या संस्था, व्यक्‍तीविरोधात जीवनावश्यक वस्तु कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात म्हटले आहे.

Wheat Market
Wheat Arrivals: दौंडमध्ये गव्हाची ६२२ क्विंटल आवक

...अशी आहे पूर्वीची आणि चौकटीत सुधारित मर्यादा

व्यापारी/ठोक विक्रेता ः १००० टन (२५० टन)

किरकोळ विक्रेता/साखळी ः प्रत्येकी पाच टन (चार टन)

प्रक्रिया उद्योजक ः एप्रिलपर्यंत स्थापीत क्षमतेच्या ५० टक्‍के (समान)

कारंजा बाजारात गव्हाची आवक वाढली

कारंजा लाड (वाशीम) बाजारात गव्हाची आवक वाढती असून ती सुमारे पाच हजार क्‍विंटलवर पोहोचली आहे. या बाजार समितीत गव्हाला कमीत कमी २७९५, तर जास्तीत जास्त २९०५ रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळत असल्याची माहिती बाजार समिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com