
Pune News: दौंड तालुक्यात नवीन गव्हाची आवक सुरू झाली असून गव्हाची एकूण ६२२ क्विंटल आवक झाली आहे. तालुक्यात गव्हास प्रतवारीनुसार किमान २५०० रुपये तर कमाल ३५०० प्रतिक्विंटल, असा दर मिळाला. मागील आठवड्यात गव्हाची एकूण ४९५ क्विंटल आवक झाली होती व त्यास प्रतवारीनुसार किमान २४०० रुपये तर कमाल ३६०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला होता.
दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड मुख्य बाजारात आणि यवत येथील उपबाजारात भुसार मालाची आवक घटली असून दर स्थिर आहे. केडगाव उपबाजारात भुसार मालाची आवक वाढली असून दर तेजीत आहे.
पाटस उपबाजारात भुसार मालाची आवक व दर स्थिर आहे. दौंड मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक व दर स्थिर आहे. केडगाव येथील उपबाजारात कांद्याची १४८९१ क्विंटल आवक होऊन प्रतवारीनुसार किमान ९०० रुपये तर कमाल ३३०० प्रतिक्विंटल, असा बाजारभाव मिळाला. मागील आठवड्यात कांद्याची ११३७४ क्विंटल आवक झाली होती व किमान ६०० रुपये तर कमाल ३३०० प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता.
शेतमालाची आवक व बाजारभाव
*शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रू.)
गहू ६२२ २५०० ३५००
ज्वारी ३६० १९०० ४०००
बाजरी २४३ २१०० ३१००
हरभरा ०५३ ५१०० ५५००
मका ०२६ २००० २३००
उडीद ००५ ५००० ६०००
तूर ०७४ ६२०० ६७००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.