
Nagpur News: मध्य प्रदेशातील बहुतांश बाजारांमध्ये गव्हाची हमीदराने खरेदी होत असतानाही गव्हाच्या दरात अपेक्षित तेजी न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्र सरकारने ग्राहकांना स्वस्तात गव्हाची उपलब्धता होण्यासाठी साठा मर्यादा लागू केली आहे. परिणामी दरात सुधारणा होत नसल्याचा दावा व्यापारी स्तरावर केला जात आहे.
२०२४-२५ या वर्षात गव्हाला २,२७५ रुपयांचा हमीभाव होता. यंदाच्या रब्बी हंगामातील गव्हासाठी शासनाकडून त्यात प्रति क्विंटल १५० रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार २०२५-२६ या वर्षात गव्हाचा हमीदर २४२५ रुपयांवर पोहोचला आहे. मध्य प्रदेशातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये नव्या हंगामातील गव्हाची आवक वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारच्या निर्देशावरून राज्यात आधारभूत खरेदीला देखील प्रोत्साहन दिले आहे.
या साऱ्याच्या परिणामी गहू बाजार तेजीत येईल आणि शेतकऱ्यांना चांगला परतावा मिळेल, असे अपेक्षित होते. त्यासोबतच खुल्या बाजारात तेजी आल्याने शासनाला देखील हमीभावाने कमी गव्हाची खरेदी करावी लागेल, अशी देखील आशा होती. परंतु हमीभाव खरेदीनंतर देखील इंदूर बाजार समितीमध्ये गव्हाचे दर २४५० ते २५०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिरावले आहेत.
अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे सोमवारी (ता. १७) अनेक शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेला ८० ते १०० ट्रॉली गहू परत नेल्याचेही सांगण्यात आले. शेतकऱ्यांना आशा आहे, की गव्हावरील साठा मर्यादा हटविल्यास प्रति क्विंटल दरात १०० रुपयांची तेजी येईल.
मध्य प्रदेश क्विंटलला १७५ रुपये बोनस
गहू उत्पादकांचे व्यापक हित जपले जावे याकरिता मध्य प्रदेश सरकारने पुढाकार घेत गव्हाला हमीभावाच्या जोडीला प्रति क्विंटल १७५ रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २४२५ रुपयांचा हमीभाव आणि १७५ रुपये बोनस याप्रमाणे २६०० रुपये क्विंटल असा दर मिळणार आहे. सुमारे ८० लाख टन खरेदी प्रस्तावित आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.