Agrowon Podcast : सोयाबीनला साडे पाच हजारांचा दर कोणत्या बाजारांमध्ये मिळतोय?

Market Rate : सोयाबीनच्या भावात सध्या नरमाई आली आहेत. सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे.
market rate
market rateagrowon

सोयाबीनचा बाजार स्थिर

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात नरमाई आली आहे. सोयापेंडचे वायदे १३.०५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. तर सोयापेंडच्या वायद्यांनी ४०९ डाॅलरचा टप्पा गाठला होता. देशातील बाजारात मात्र सोयाबीनचे दर स्थिर होते. सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सोयाबीनचे दर काही काळ टिकून राहू शकतात असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यसकांनी व्यक्त केला. 

कापूस भाव दबावातच

देशातील बाजारात कापसाचे सध्या दबावात आहे. कपासाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार २०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक सरासरीपेक्षा जास्त आहे. रोज ८० हजार गाठींच्या दरम्यान कापूस बाजारात येत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे ८६.६३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. देशातील बाजारात कापसाची आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा दिसू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. 

गव्हाच्या दरात सुधारणा

देशातील बाजारात सध्या गव्हाचे भाव सुधारले आहेत. बाजारातील गहू आवक सध्या कमी दिसते. सरकारची खरेदीही सुरु आहे. त्यातच गहू पिकाला यंदा बदलत्या वातावरणाचा फटका बसत आहे. त्यामुळे खुल्या बाजारात दरात सुधारणा झाली. त्यामुळे सध्या गव्हाला प्रतिक्विंटल २ हजार ते २ हजार ३०० रुपयांचा भाव मिळत आहे. गव्हाचे भाव पुढील काळात आणखी सुधारण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. 

ज्वारीचे दर तेजीत

ज्वारी सध्या बाजारात चांगलाच भाव खात आहे. बाजारातील आवक कमी होत आहे. यंदा देशातील ज्वारी उत्पादनाला फटका बसला. खरिपातील उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले. तर रब्बी हंगामात लागवड वाढूनही बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसला. परिणामी सध्या बाजारातील आवक कमी आहे. त्यामुळे ज्वारीचे दर तेजीत आहेत. सध्या ज्वारीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. ज्वारीचे दर पुढील काळातही टिकून राहू शकतात, असा अंदाज ज्वारी बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com