Watermelon Market : खानदेशात कलिंगड दरात सुधारणा

खानदेशात अनेक भागांत कलिंगडाची काढणी सुरू झाली आहे. दरात सुधारणा झाली असून, कमाल नऊ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर मिळत आहे.
Watermelon
WatermelonAgrowon

Watermelon Market जळगाव ः खानदेशात अनेक भागांत कलिंगडाची काढणी (Watermelon Harvesting) सुरू झाली आहे. दरात सुधारणा झाली असून, कमाल नऊ रुपये प्रतिकिलोचा दर (Watermelon Rate) जागेवर मिळत आहे. मध्यंतरी दर पाच रुपये प्रतिकिलो मिळत होते.

यंदा थंडीचा हंगाम काहीसा लांबला. यामुळे कलिंगडाची काढणीही रखडली किंवा लांबत गेली. यातच अनेक शेतकऱ्यांच्या कलिंगड पिकाला विषाणूजन्य रोगांचा फटका बसला. त्यात पीक वाया गेले. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कलिंगड पिकातून अल्प उत्पादन हाती आले.

काही शेतकऱ्यांना एकरी फक्त सात ते आठ टन उत्पादन फेब्रुवारीच्या मध्यात हाती आले. या महिन्यात अनेक भागांत काढणी सुरू झाली आहे.

Watermelon
Watermelon Cultivation : कलिंगड शेतीत खर्च, उत्पन्नाचा ताळमेळ बसेना

ही काढणी सुरूच राहील. परंतु शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा होती. कारण फेब्रुवारीत फक्त पाच रुपये प्रतिकिलोचा दर जागेवर किंवा थेट शिवार खरेदीत मिळत होता. पण मागील सात ते आठ दिवसांत दरात सुधारणा झाली आहे.

मागील आठवड्यात दर्जेदार कलिंगडास जागेवर प्रतिकिलो आठ ते साडेआठ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला.

या आठवड्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून जागेवर नऊ ते साडेनऊ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. दर स्थिर आहेत. कारण कलिंगडाची काढणी सर्वत्र सुरू नाही. आवक रखडत सुरू आहे.

Watermelon
Watermelon Cultivation : कलिंगडाची लागवड ठरली फायदेशीर

खानदेशात सुमारे तीन हजार हेक्टरवर कलिंगडाची लागवड झाली होती. यंदा लागवड सुमारे ६०० ते ७०० हेक्टरने वाढली.

अनेकांनी डिसेंबरमध्ये लागवड केली. तर काही शेतकऱ्यांनी डिसेंबरअखेर लागवड केली. ज्यांनी डिसेंबरअखेर लागवड केली आहे. त्या शेतकऱ्यांचे पीक बऱ्यापैकी आहे.

परंतु डिसेंबरच्या सुरुवातीला लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाची प्रतिकूल वातावरण व विषाणूजन्य रोगांमुळे हानी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकात ६५ ते ७० दिवसांनंतर काढणी सुरू झाली आहे.

Watermelon
Watermelon market: कलिंगडाला मागणी वाढली

काही शेतकऱ्यांनी ७५ ते ७९ दिवस लागवडीला पूर्ण झाल्यानंतर काढणी सुरू केली आहे. अर्थात, यंदा लागवड वाढली, परंतु उत्पादन कमी आहे.

मागील हंगामात कमाल शेतकऱ्यांना एकरी २१ ते २२ टन एवढे उत्पादन मिळाले होते. यंदा काही शेतकऱ्यांनाच एकरी २२ ते २३ टन उत्पादन येत आहे. परंतु कमाल शेतकऱ्यांना उत्पादन एकरी २० टनांपर्यंत येत आहे.

कलिंगडास उत्तर भारतासह पश्‍चिम बंगाल व इतर भागांत मागणी आहे. मुंबई, पुणे, ठाणे आदी भागातही कलिंगडाची पाठवणूक खानदेशातून होत आहे. सध्या रोज १२ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) कलिंगडाची आवक खानदेशात होत आहे.

जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, जामनेर या भागात अधिकची आवक होत आहे. धुळ्यात शिरपूर व नंदुरबारात शहादा, तळोदा व नवापूर भागात कलिंगडाची आवक बऱ्यापैकी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com