Watermelon Cultivation : कलिंगड शेतीत खर्च, उत्पन्नाचा ताळमेळ बसेना

पूर्वी केवळ उन्हाळ्यात मिळणारी कलिंगडाची फळे आता वर्षभर मिळतात. यातून पैसासुद्धा शेतकऱ्यांना मिळत होता.
Watermelon Cultivation
Watermelon CultivationAgrowon

Watermelon Farming अकोला ः कमी कालावधीचे पीक तसेच हमखास उत्पन्न (Income) मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे या पिकाकडे आता अनेकांचा कल वाढला आहे. मात्र, आता या शेतीतील उत्पादन खर्च (Watermelon Production Cost) आणि मिळणारे उत्पन्न याचा अनेकांना ताळमेळ बसत नसल्याने ही शेती तोट्याचा सौदा ठरू लागली आहे.

पूर्वी केवळ उन्हाळ्यात मिळणारी कलिंगडाची फळे आता वर्षभर मिळतात. यातून पैसासुद्धा शेतकऱ्यांना मिळत होता. आता परिस्थिती बदलत आहे.

वातावरण बदलाचे फटके या पिकालाही सहन करावे लागत आहेत. पाण्यात विरघळणाऱ्या खतांच्या किमती मागील दोन-तीन वर्षांत झपाट्याने वाढल्या आहेत.

Watermelon Cultivation
Watermelon Farming : सिंधुदुर्गात शेकडो टन कलिंगडे शेतातच पडून

२०२१ मध्ये १९.१९.१९ या खताच्या बॅगेची किंमत २००४ रुपये होती. २०२२ मध्ये ती २५ किलो वजनाची बॅग २३३० रुपयांना झाली.

आता हीच बॅग तब्बल ३८५० रुपयांना आहे. दोन वर्षांत खताची बॅग १४०० रुपयांनी महागली. कलिंगडाचा दर मात्र २०२१ मध्ये होता, त्याहीपेक्षा आता कमी मिळत आहे.

Watermelon Cultivation
Watermelon Cultivation : कलिंगडाची लागवड ठरली फायदेशीर

यंदाच्या हंगामाची सुरुवात अवघी ५०० रुपयांपासून झाली. सध्या कलिंगड ७०० ते ७५० रुपये क्विंटल विकत आहे. आधीच विपरीत वातावरणामुळे फळांचा आकार व्यवस्थित तयार झालेला नाही.

वजनदार फळे बनलेली नाहीत. त्यामुळे या वर्षात सरासरी ८ ते १० टनापर्यंत उत्पादन येईल, अशी शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

खर्च आवाक्याबाहेर

सध्याच्या दराने एकरी उत्पादन केवळ ७० ते ७५ हजारांचे होते. तर लागवडीपासून पीक काढणीपर्यंत कलिंगड शेतीचा एकरी उत्पादन खर्च हा या उत्पादनापेक्षा अधिक झाला आहे. पेरणीपूर्व मशागत, बियाणे, लागवड, निविष्ठा, कीटकनाशकांची फवारणी, सिंचन, इतर मजुरी हा सर्व खर्च ७० ते ९० हजारापर्यंत म्हणजेच आवाक्याबाहेर गेला आहे.

मागील तीन वर्षांत कलिंगड शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व निविष्ठा महागल्या. खताचे दर दुप्पट झाले. तर दर मात्र आहे, तेव्हढाच मिळतो. सध्या तर दरही कमालीचे कमी आहेत. हे सर्व पाहता कलिंगड उत्पादकांचा खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ बसेनासा झाला आहे.

- अनिल इंगळे, कलिंगड उत्पादक, चितलवाडी, जि. अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com