Banana Export : खानदेशातून दोन हजार कंटेनर केळीची होणार आखातात निर्यात

खानदेशातून परदेशात केळी निर्यातीला फेब्रुवारीच्या मध्यानंतर किंवा अखेरीस वेग येणार आहे. यंदा सुमारे दोन हजार कंटेनरची (एक कंटेनर २० टन क्षमता) निर्यात परदेशात होईल.
Banana Export
Banana ExportAgrowon

जळगाव ः खानदेशातून परदेशात केळी निर्यातीला (Banana Export) फेब्रुवारीच्या मध्यानंतर किंवा अखेरीस वेग येणार आहे. यंदा सुमारे दोन हजार कंटेनरची (एक कंटेनर २० टन क्षमता) निर्यात परदेशात होईल. एकट्या जळगाव जिल्ह्यातून सुमारे १२०० ते १३०० कंटेनर केळीची (Banana Production) पाठवणूक आखातात होईल, असा अंदाज आहे.

Banana Export
Grape Export : राज्यातून द्राक्ष निर्यात सुरू

आखातातून केळीला मोठी मागणी आहे. ही मागणी देशातून सध्या पूर्ण होवू शकत नसल्याचे चित्र आहे. कारण निर्यातक्षम केळी काही भागांचा अपवाद वगळता उपलब्ध नाही. सध्या फक्त आंध्र प्रदेश व सोलापुरातून आखातात केळी निर्यात सुरू आहे.

पण खानदेशात फेब्रुवारीच्या मध्यानंतर निर्यातक्षम केळी काढणीसाठी उपलब्ध होईल. किमान तापमानात मोठी घट होवूनही शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन करून केळीची गुणवत्ता व दर्जा कायम राखला आहे.

Banana Export
Grape Export : राज्यातील द्राक्ष निर्यातीचे चित्र काय आहे?

यंदा दोन हजार कंटेनर मार्चपासून ते जूनपर्यंत खानदेशातून आखातात पाठविले जातील. जळगाव जिल्ह्यातून सुमारे १२०० ते १३०० कंटेनर यंदा आखातात जातील. धुळे व नंदुरबारमधून सुमारे ८०० कंटेनर पाठविले जातील. आखातातील इराण, इराक, बहरीन, दुबई, सौदी अरेबिया आदी भागात केळी पाठविली जाईल.

त्यासंबंधी खानदेशात निर्यातदार कंपन्यांकडून चाचपणी, चर्चा सुरू आहे. निर्यातीच्या केळीला सध्या कमाल तीन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. पुढेही दर टिकून राहतील, असा अंदाज आहे. खानदेशातून २०१६ मध्ये निर्यात सुरू झाली होती.

तांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) येथून हा कंटेनर पाठविण्यात आला होता. नंतर निर्यातीत सतत वाढ झाली. अनेक कंपन्यांनी केळी निर्यातीसंबंधी काम सुरू केले. फक्त कोविड काळात निर्यातीवर परिणाम झाला.

कारण कंटेनरचा तुटवडा होता. तसेच कंटेनरची भाडेवाढही झाली. खानदेशातून आखातात केळी पाठवणुकीसाठी एका कंटेनरसंबंधी दोन लाख ७५ हजार रुपये प्रतिकंटेनर एवढे भाडे द्यावे लागत होते. परंतु आता कंटेनरचा तुटवडा नाही.

यामुळे भाडेदर पूर्ववत झाले आहे किंवा कमी झाले आहेत. २०२२ मध्ये कंटेनरच्या तुटवड्याने खानदेशातून केळी निर्यात घटली होती. ती १२०० कंटेनर एवढीच मर्यादित राहीली. यातच कंटेनरचे भाडे रावेरपासून जेएनपीटीपर्यंत ७५ हजार रुपये. शहादा (जि. नंदुरबार) येथून ६० हजार रुपये एवढे आहे. यामुळे शहादा भागातून केळीची निर्यात वाढत आहे.

खानदेशातून केळीची निर्यात दृष्टिक्षेपात (निर्यात कंटेनरमध्ये)

वर्ष---निर्यात

२०१७---११२

२०१८---एक हजार

२०१९---एक हजार ३००

२०२०---५००

२०२१---६००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com