Warehouse Security Deposit : शेतकऱ्यांकरिता वखारच्या सुरक्षा ठेवीत दोन टक्क्यांनी घट

Piyush Goyal : राजधानी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्री गोयल यांनी डब्ल्यूडीआरएच्या सुविधांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा जाहीर केला.
Warehouse Scheme
Warehouse SchemeAgrowon

New Delhi News : केंद्रीय वाणिज्य अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी वखार विकास आणि नियामक प्राधिकरण (डब्ल्यूडीआरए) अंतर्गत गोदामांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षा ठेवीत दोन टक्क्यांनी घट करून सध्याच्या ३ टक्क्यांवरून ती १ टक्क्यापर्यंत कमी करण्याचे आश्वासन सोमवारी (ता. ४) दिले.

राजधानी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान, केंद्रीय मंत्री गोयल यांनी डब्ल्यूडीआरएच्या सुविधांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा जाहीर केला. या गोदामांचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा ठेव दोन टक्क्यांनी कमी करून सध्याच्या ३ टक्क्यांवरून ती १ टक्क्यापर्यंत केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

Warehouse Scheme
Warehouse Scheme : शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची 'गाव तिथे गोदाम योजना'

हा बदल प्रामुख्याने लहान शेतकऱ्यांना (Farmer) मदत करण्याच्या उद्देशाने आहे, जे सहसा उच्च सुरक्षा ठेवींच्या आर्थिक भाराने संघर्ष करतात. कमीतकमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शून्य सुरक्षा ठेव ठेवण्याचा विचार करण्याबाबत सूचना त्यांनी केली.

गोयल यांनी गोदामाच्या नोंदणीसाठी अर्ज शुल्काच्या मुद्द्यावरही लक्ष वेधले. सहकार क्षेत्रात बांधलेल्या सर्व गोदामांमध्ये शेतकऱ्यांना नोंदणीसाठी अर्ज मोफत द्यावेत जेणेकरून शेतकऱ्यांना साठवणुकीच्या सुविधांचा लाभ मिळू शकेल, अशी विनंती त्यांनी डब्ल्यूडीआरएला केली.

(ॲग्रो विशेष)

या हालचालीमुळे शेतकऱ्यांसाठी साठवण सुविधा अधिक सुलभ आणि परवडण्याजोग्या बनतील, त्यांना या संसाधनांचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सध्या, प्रतिगोदाम केवळ कृषी माल साठवणाऱ्या गोदामांचे नोंदणी/नूतनीकरणाच्या अर्जासाठी ५०० ते २५००० टन क्षमतेसाठी रुपये ५,००० ते ३०,००० रुपये नॉन-रिफंडेबल शुल्क आकारले जाते. शेतकरी-उत्पादक संस्था किंवा प्राथमिक कृषी सहकारी पतसंस्था किंवा स्वयं-सहायता गटांसाठी हे शुल्क ५०० रुपये आहे.

Warehouse Scheme
Agriculture Warehouse : गाव तिथे गोदाम योजना दोन महिन्यांत दृष्टिपथात

गोदाम विकास आणि नियामक प्राधिकरण २००७ च्या वखार (विकास आणि नियमन) कायद्याअंतर्गत स्थापन करण्यात आले असून भारतातील गोदाम व्यवसायाच्या सुव्यवस्थित वाढीचे नियमन आणि प्रोत्साहन देण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. नवी दिल्ली येथे मुख्यालय असल्याने, डब्ल्यूडीआरए हे गोदाम पावतींची वाटाघाटी सुनिश्चित करण्यासाठी आणि गोदाम क्षेत्राच्या विकासासाठी जबाबदार आहे.

ज्यामुळे शेतकरी आणि कृषी उद्योगाला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. अलीकडील धोरणातील बदल आणि मंत्री गोयल यांनी केलेल्या सूचनांमुळे डब्ल्यूडीआरए भारताच्या कृषी समुदायाला पाठिंबा देण्याच्या मिशनमध्ये अधिक सक्षम बनण्याची अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com