Papaya Rate : पपईस आठ रुपये एक पैसा दर निश्चित

Papaya Market : दर वाढवून देऊ शकत नाही, असा हेका व्यापाऱ्यांनी लावला. बैठकीत शेतकऱ्यांनी कमीत कमी १० रुपये दराने पपई खरेदी करा, अशी मागणी केली;
Papaya Rate
Papaya Rate Agrowon
Published on
Updated on

Shahada News : यंदा फळाचा आकार लहान आहे, त्याचबरोबर व्हायरसचा माल असल्याने आतून खराब निघतो, शिवाय मुख्य बाजारात मंदी आहे. त्यामुळे आम्ही दर वाढवून देऊ शकत नाही, असा हेका व्यापाऱ्यांनी लावला. बैठकीत शेतकऱ्यांनी कमीत कमी १० रुपये दराने पपई खरेदी करा, अशी मागणी केली;

परंतु व्यापाऱ्यांनी तो दर नाकारत सात रुपयांपेक्षा अधिक दर परवडत नसल्याचे सांगितले. या वेळी दरासंबंधी शेतकरी व व्यापारी यांच्यात तब्बल चार तास चांगलीच चर्चा झाली. अखेर सर्वानुमते आठ रुपये एक पैसा प्रतिकिलो दर ठरविण्यात आला असून, याच दराने पुढील बैठक होईपर्यंत शेतकऱ्यांनी रविवार (ता. ३)पासून पपई कटिंग करावी, असे नंदुरबार जिल्हा केळी-पपई फळबागायतदार संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.

Papaya Rate
Papaya Cultivation : पपई लागवड वाढण्याची शक्यता

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपई दर ठरविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, पपई उत्पादक शेतकरी खरेदीदार व्यापारी व पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या समितीची सयुक्तिक बैठक झाली.

या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, सचिव संजय चौधरी, शेतकरी संदीप पाटील, दीपक पटेल, प्रकाश पाटील, युवराज पाटील, भाऊ पाटील आदींसह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी व दर समन्वय समिती तसेच व्यापारी हाजी सरताज, हाजी नफीज, हाजी अनवर, मुल्ला शौकत, प्रकाशभाई माळी, नाजिम शेठ आदींसह १५ ते २० पपई खरेदीदार व्यापारी बैठकीत उपस्थित होते.

या वेळी सुरवातीला पपईला प्रतिकिलो १० रुपयांच्या वरती दर मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी बैठकीत केली; परंतु व्यापाऱ्यांनी फळाचा आकार लहान त्याचबरोबर व्हायरसचा माल असल्याने आतून खराब निघतो, अशी कारणे सांगत मुख्य बाजारपेठेत मालाला उठाव नाही म्हणून सात रुपयांपेक्षा अधिकचा दर देणे आम्हाला परवडत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले; परंतु या वेळी शेतकऱ्यांनीही खर्च मोठ्या प्रमाणावर झाल्याने मालाला अपेक्षित भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली;

Papaya Rate
Papaya Market : खानदेशात पपईची आवक रखडत

परंतु व्यापाऱ्यांनी काही केल्या आम्हाला भाव परवडत नसल्याने खरेदी कशी करावी, असा प्रश्न उपस्थित केला. या वेळी इतर राज्यांतील मार्केटचे दरही व्यापाऱ्यांसमोर ठेवण्यात आले. तब्बल चार तास चाललेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी नऊ रुपये दर सांगितला. यावरही व्यापाऱ्यांनी नकार देत अखेर चर्चेअंती समन्वयाने आठ रुपये एक पैसा प्रतिकिलो दर ठरविण्यात आला.

जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकऱ्यांनी पुढील बैठक होईपर्यंत रविवारपासून बैठकीत ठरलेल्या दराप्रमाणेच पपईची कटिंग करावी, असे आवाहन नंदुरबार जिल्हा केळी पपई फळबागातदार संस्थेतर्फे करण्यात आले. या वेळी बैठकीला निझर, तळोदा, नंदुरबार, शहादा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

आजच्या बैठकीत पपई उत्पादक शेतकरी, व्यापारी यांच्यात समन्वयाने चर्चेअंती दर ठरविण्यात आला. सध्या खराब हवामान व बाजारात असलेल्या मंदीमुळे पपईला अपेक्षित दर मिळत नाही; परंतु शेतकऱ्यांच्या पदरात अधिकाधिक दर पाडून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
अभिजित पाटील, अध्यक्ष, नंदुरबार जिल्हा केळी-पपई फळबागायतदार संस्था

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com