Turmeric Market : हिंगोलीत हळदीला मिळतोय ११५५० ते १४१०० रुपयांचा दर

Turmeric Rate : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. २५) हळदीची १५०० क्विंटल आवक होती.
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. २५) हळदीची १५०० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान ११५५० ते कमाल १४१०० रुपये तर सरासरी १२८२५ रुपये दर मिळाले.

संत नामदेव हळद मार्केटमध्ये आठवड्यातील सोमवार ते शुक्रवार अशी सहा दिवस हळदीची आवक घेतली जात आहे. मागील काही दिवसांपासून हळदीचे स्थिर आहेत. दरात किंचित चढ-उतार होत आहेत.

Turmeric Market
Turmeric Market : परभणीत लिलावाद्वारे हळद खरेदी-विक्री सुरू करणार

शुक्रवारी (ता. २२) हळदीची १८०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १३०५० ते कमाल १४५१० रुपये तर सरासरी १३ हजार ५७५ रुपये दर मिळाले.गुरुवारी (ता. २१) हळदीची ६५५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १२५०० ते कमाल १४८०० रुपये तर सरासरी १३६५० रुपये दर मिळाले, असे बाजार समितीचे सचिव नारायण पाटील यांनी सांगितले.

सोयाबीनच्या दरातील तफावत कायम...

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारातील सोयाबीनचे दर आणि हमीभाव यांच्यातील तफावत कायम आहे. मागील आठवड्यात सोयाबीनला सरासरी प्रतिक्विंटल ४०९० ते ४१३० रुपये दर मिळाले.सोमवारी (ता. २५) सोयाबीनची १००५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३९०० ते कमाल ४३०० रुपये तर सरासरी ४१०० रुपये दर मिळाले.

Turmeric Market
Turmeric Market : हिंगोली बाजार समितीत हळदीची १ लाख क्विंटल आवक

शुक्रवारी (ता. २२)सोयाबीनची ७०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३८४० ते कमाल ४३४० रुपये तर सरासरी ४०९० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २१) सोयाबीनची ५४० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३९०० ते कमाल ४४०० रुपये तर सरासरी ४१५० रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता. १९) सोयाबीनची ७०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३८९० ते कमाल ४३७० रुपये तर सरासरी ४१३० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. १८) सोयाबीनची ९४० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३८८० ते कमाल ४४०० रुपये तर सरासरी ४१४० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com