
Nagpur News : नव्या हंगामातील हळदीची आवक होण्यास असलेला दोन महिन्यांचा विलंब त्यासोबचत काही भागांत पिकावर करपा रोगाचा झालेला प्रादुर्भाव यामुळे बाजारात हळदीची आवक मंदावली आहे. परिणामी, हिंगोली बाजारात हळदीच्या दरात सुधारणा अनुभवण्यात आल्याची माहिती व्यापारी अशोक बाहेती यांनी दिली.
पोषक वातावरण त्यासोबचत पारंपरिक पीक पद्धतीत शास्त्रोक्त व्यवस्थापनावर भर यासह इतर अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांत मराठवाड्यातील हळद लागवड क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. राज्याच्या एकूण दोन तृतीयांश क्षेत्र एकट्या मराठवाड्यात असल्याचे जाणकार सांगतात.
हळदीची परंपरागत शेती या भागात होते. त्यामुळे आता हे मराठवाड्याचे मुख्य पीक झाले आहे. यातून चांगला पैसा देखील या भागातील शेतकऱ्यांना होत आहे. मात्र दरातील घसरणीच्या परिणामी अनेकदा नुकसानही सोसावे लागते.
व्यापारी अशोक बाहेती यांच्या माहितीनुसार सध्या हिंगोली बाजारातील हळदीची आवक १५०० क्विंटल इतकी जेमतेम आहे. हळदीच्या बंडाचे दर प्रति क्विंटल १२ हजार २०० रुपये होते. त्यात सुधारणा होत हे दर १३,७०० रुपयांवर पोहोचले आहेत. बाजारात सेलम जातीच्या हळद कांडीच्या दरातही सरासरी दोन हजार रुपयांची तेजी अनुभवण्यात आली आहे. याचे दर प्रति क्विंटल १३,००० रुपयांवरून १५,४०० रुपयांवर पोहोचले आहेत, असेही श्री. बाहेती यांनी सांगितले.
दरवाढीची ही आहेत कारणे
हळद उत्पादकपट्ट्यात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे उत्पादकता प्रभावित होणार आहे. त्यासोबतच निजामाबाद भागातून हळदीची आवक पुढील महिन्यात होईल. महाराष्ट्रातील मालाची आवक मार्च-एप्रिल महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे नव्या हंगामातील हळदीची आवक होण्यास बराचसा कालावधी असल्याने हळदीच्या दरात सरासरी प्रति क्विंटल १५०० ते २००० रुपयांची तेजी आली आहे.
उत्पादकता राहील ६० लाख पोते
हळद तज्ज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांच्या माहितीनुसार, राज्याची हळद उत्पादकता ८० लाख पोते (५० किलो प्रति पोते) याप्रमाणे आहे. कंदकुजचा प्रादुर्भाव झाल्याने त्यात २० ते २५ टक्के घट होत ही उत्पादकता ६० ते ६५ लाख पोत्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा हळदीचा हंगाम तुलनेत चांगला राहील, अशी अपेक्षा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.