
Hingoli News: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीची आवक वाढली आहे. मंगळवारी (ता. १५) मार्केटमध्ये हळदीची २१५० क्विंटल आवक होती. हळदीला प्रति क्विंटल किमान ११,६०० ते कमाल १४,१०० रुपये तर सरासरी १२,८५० रुपये दर मिळाले.
हिंगोली बाजार समितीत मार्च महिन्यात नवीन हळदीची आवक सुरू झाली त्या वेळी काही दिवस हळदीचे दर दहा हजार रुपयांच्या खाली गेले होते. त्यामुळे शेतकरी चिंतित झाले होते. परंतु एप्रिलमध्ये दरामध्ये सुधारणा होऊन परत दहा हजारांवर पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
गेल्या काही दिवसांपासून हळदीचे सरासरी दर १२ हजार ते १४ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. सुट्ट्या असल्यामुळे हळद खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद राहिले. शुक्रवारी (ता. ११) हळदीची ९५० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ११,४०० ते कमाल १३,९०० रुपये तर सरासरी १२,६५० रुपये दर मिळाले.
बुधवारी (ता. १०) हळदीची १९०० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान १२ हजार ते कमाल १४,२५० रुपये तर सरासरी १३,१२५ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ८) हळदीची १८७० क्विंटल आवक असताना प्रति क्विंटल किमान ११,५०० ते कमाल १४ हजार रुपये तर सरासरी १२,७५० रुपये दर मिळाले.
हिंगोली जिल्ह्यात २०२४ मध्ये ३२ हजारांवर हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. गतवर्षीच्या (२०२३) तुलनेत हळदीच्या क्षेत्रात ८ हजारांवर हेक्टरने वाढ झाली. त्यामुळे उत्पादनात वाढ अपेक्षित होती. यंदाच्या हंगामातील हळद काढणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. विविध कारणांनी हळदीचा उतारा कमी येत असल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे हळदीच्या दरात तेजी राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.