Tur Market: आता ब्राझील, ऑस्ट्रेलियात तूर उत्पादन करून आयात करणार

Tur Import : देशात तुरीचे भाव तेजीत आहेत. चालू हंगामातही तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे. सरकारने आयात करून तुरीचा पुरवठा वाढीसाठी प्रयत्न सुरु केले.
Tur Market
Tur MarketAgrowon

Pune News : देशात तुरीचे भाव तेजीत आहेत. चालू हंगामातही तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे. सरकारने आयात करून तुरीचा पुरवठा वाढीसाठी प्रयत्न सुरु केले. पण विदेशातही तुरीचा पुरवठा कमी आहे. आफ्रिका आणि म्यानमारमधून तुरीची आयात होतेच. आता ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्येही तुरीचे उत्पादन करून आयात केली जाणार आहे.

भारतात आफ्रिकेतील मालावी, टंझानिया, मोझांबिक आणि केनिया तसेच म्यानमार या देशांमधून तुरीची आयात होते. चालू हंगामात देशातील तूर उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे पुरवठा कमी झाला. परिणामी देशातील तुरीच्या भावात मोठी वाढ झाली. तुरीचे भाव गगणाला भीडले.

भारताने तूर आयातीसाठी प्रयत्न केले. भारताने तूर आयातीसाठी दारे खुली केली तरी ९ लाख टनांपेक्षा जास्त आयात झाली नाही. तर दुसरीकडे देशातील तूर उत्पादनात मोठी घट असल्याने ही आयातही अपुरी पडली. यामुळे तुरीच्या भावाने १० हजारांचा टप्पा पार केला.

Tur Market
Tur Market :तूर दरातील तेजी आणखी किती दिवस टिकेल?

देशातील तूर लागवडही आतापर्यंत ३८ टक्क्यांनी कमी आहे. तुरीखाली आतापर्यंत १७ लाख हेक्टरवर तुरुची लागवड झाली. गेल्यावर्षी याच काळातील लागवड २७ लाख ५६ हजार हेक्टरवर होती. म्हणजेच आतापर्यंत तूर लागवड मोठ्या प्रमाणात पिछाडीवर आहे.

त्यातच यंदा एल निनोची स्थिती असल्याने पुढील काळात पाऊसमान कसे राहील, याबाबतही शाशंकता आहे. त्यामुळे तूर उत्पादनाबाबतही चिंता आहे. परिणामी पुढील वर्षातही तुरीचे भाव तेजीत राहण्याचा अंदाज आहे. यामुळे तूर आयातीचे इतर स्त्रोतांची चाचपणी सुरु आहे.

Tur Market
Tur Market : तूर उत्पादनात यंदाही मोठ्या वाढीची आशा धुसरच

आता ब्राझील आणि ऑस्ट्रेलियात तूर लागवडीचे प्रयोग करण्यात येणार आहे. यापुर्वी या देशांमधून मसूरची आयात व्हायची. सध्या ऑस्ट्रेलिया भारताला हरभरा निर्यात करणारा महत्वाचा देश आहे.

ऑस्ट्रेलियाचे कृषीमंत्री मुर्रे वॅट्ट यांच्यासोबत भारतीय अन्न महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि इंडियन पल्सेस अॅन्ड ग्रेन्स असोसिएशन अर्थात आयपीजीएचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलियातील क्विन्सलॅन्ड येथे तूर लागवडीचा प्रयोग होणार आहे. आयपीजीएने ब्राझीलसोबतही करार करून येथील शेतकऱ्यांना तूर उत्पादनाचे प्रशिक्षण देणार आहे.

अन्न मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दलेल्या माहितीनुसार, देशात मागणीपेक्षा पुरवठा १७ लाख टनांनी कमी आहे. त्यामुळे कोणत्याही पुरठादारांना भारताला तूर विकण्याची संधी आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले देशातील तूर पुरवठा कमी असल्यामुळेच तुरीचे भाव तेजीत आहेत.

भारतीय आयातदारांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर कितीही जोर लावून आयात वाढवली तरी तूर पूरवठ्यातील तूट भरून काढणे अशक्य आहे, असे जाणकारांनी सांगितले. त्यामुळे तुरीचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज व्यक्त केला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com