Tur Market : विदर्भातील बहुतांश बाजारांत तूरदर दबावात

Tur Rate : विदर्भात अकोला वगळता बहुतांश बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर दबावात आले आहेत. अवकाळी तसेच मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने पीक खराब झाले.
Tur Market
Tur MarketAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : विदर्भात अकोला वगळता बहुतांश बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर दबावात आले आहेत. अवकाळी तसेच मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने पीक खराब झाले. परिणामी अपेक्षित रंग नसल्यामुळे तसेच दाणा बारीक असल्याने दरात घसरण झाल्याची शक्यता ऑल इंडिया दाल मिल असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल यांनी व्यक्त केली. प्रतिक्विंटल ४०० ते ६०० रुपयांची घसरण दरात नोंदवली गेली आहे.

अमरावती बाजार समितीत दरात वाढीची शक्यता नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर तूर विक्रीसाठी आणत आहेत. बाजार समितीतील सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ३) तब्बल साडेचार हजार क्विंटल तुरीची आवक झाली. तुरीला ११००० ते ११ हजार ५०० रुपयांचा दर मिळाला.

गेल्या महिन्यात तूर १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचली होती. नागपूरच्या कळमना बाजार समितीत ११८८ रुपयांचा दर तुरीला मिळत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रतिक्विंटल ९०० रुपयांची घट झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव बाजार समितीत ९५०० ते ११ हजार ३५५ रुपये दर आहे.

Tur Market
Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

आवक जेमतेम ५० क्विंटल झाली. शेगाव बाजार समितीत आधीपासूनच तुरीचे दर दबावात असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. अकोला बाजार समितीत ७७७० ते १२ हजार १०० रुपये दर राहिला. आवक मात्र अवघी १४५० क्विंटल झाली.

अकोल्यातील तुरीचा सरासरी दर दहा हजार रुपयांचा होता. यवतमाळ बाजार समितीत १०४०० ते ११४०० रुपयांनी तुरीचे व्यवहार झाले. येथील दर स्थिर राहिले आहेत. वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत १०००५ ते ११८५० रुपये दर आहे. आवक ८५० क्विंटलची आहे.

Tur Market
Tur Market : तुरीला मिळतोय ११ हजारांच्या पुढे भाव

‘‘देशातील इतर भागाच्या तुलनेत महाराष्ट्र व कर्नाटकातील तुरीचा दर्जा चांगला राहतो. त्यामुळेच या भागातील तुरीला मागणी आणि दरही चांगला मिळतो. चांगल्या प्रतीच्या तुरीला आजही १२ हजाराचा दर मिळत आहे.

केनिया, मलावी, झिंबाब्वे (साऊथ आफ्रिका) या भागातील तूर सप्टेंबर महिन्यात येते. तोवर देशांतर्गत तूर डाळीची गरज भागवण्यासाठी अपेक्षित साठा सध्या आहे. प्रक्रिया उद्योजकांकडून १६० ते १६२ रुपये किलो घाऊक दराने तूरडाळ ट्रेडर्सला दिली जात आहे,’’ असेही अग्रवाल यांनी सांगितले.

दाण्याचा आकार आणि रंग हा दरावर परिणाम करणारा घटक ठरतो. प्रक्रियेत यालाच महत्त्व आहे. त्यामुळे दर्जानुसार तुरीला दर मिळतो. अवकाळी पावसामुळे कर्नाटक, महाराष्ट्रात तुरीला फटका बसला. त्यामुळे प्रत खालावली. आता शेवटच्या टप्प्यातील तूर असल्याने दर कमी मिळत असावेत.
- सुरेश अग्रवाल, अध्यक्ष, ऑल इंडिया दालमिल असोसिएशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com