Tur Procurement : तूरखरेदीचे निकष स्पष्ट, खरेदीचा गोंधळ कायमच

Tur Market : भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत शासकीय केंद्रांवर तूर खरेदीचे निकष निश्चित करण्यात आले असले तरी खरेदीकेंद्र मात्र पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत.
Tur Rate
Tur Market Agrowon
Published on
Updated on

Amaravati News : भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) मार्फत शासकीय केंद्रांवर तूर खरेदीचे निकष निश्चित करण्यात आले असले तरी खरेदीकेंद्र मात्र पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाहीत. जिल्ह्यात वीस खरेदी केंद्रे असताना केवळ चारच केंद्रांवर खरेदी सुरू होऊ शकली आहे.

त्यामुळे आर्थिक चणचणीपायी शेतकऱ्यांनी खुल्या बाजाराचा मार्ग निवडला आहे. बाजार समितीमधील आवक यामुळे वाढली आहे. या बाजारात तुरीला सरासरी ७,३२५ रुपये दर प्रति क्विंटलला मिळू लागला आहे. सोयाबीनपाठोपाठ राज्य सरकारने तुरीची शासकीय खरेदी करण्याचा निर्णय लागू केला आहे.

Tur Rate
Tur Procurement : हमीदराने हेक्टरी नऊ क्विंटल तूर होणार खरेदी

त्यासाठी उत्पादकतेच्या आधारावर खरेदीचे उद्दिष्ट निश्चित करताना मात्र हात आखडता ठेवला आहे. एकूण उत्पादनाच्या केवळ २५ टक्के तूर हमीदराने खरेदी केल्या जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खासगी बाजाराचा मार्ग निवडला आहे. अमरावती जिल्ह्यात यंदा १ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्रात तुरीची पेरणी होती.

कृषी विभागाने जिल्ह्यात यंदा १३६० किलो प्रति हेक्टर (५.४४ क्विंटल प्रति एकर) उत्पादनाची सरासरी काढली असून एकूण १ लाख ५८ हजार ६१६ टन उत्पादन होईल, असे म्हटले आहे. कृषी विभागाच्या या माहितीवर सहकार व पणन विभागाने २५ टक्के म्हणजे ३९ हजार ६५४ टन खरेदीचे उद्दिष्ट जिल्ह्यास दिले आहे.

Tur Rate
Tur Procurement : तूर खरेदीला अद्याप मुहूर्तच नाही

शासकीय खरेदीसाठी नाफेडने विदर्भ मार्केटिंग व जिल्हा मार्केटिंगला अभिकर्ता म्हणून नियुक्त केले असून जिल्ह्यात वीस केंद्रे प्रारंभ केली आहेत. यातील सद्यःस्थितीत केवळ वरुड, चांदूररेल्वे, दर्यापूर व तिवसा या चारच केंद्रांवर खरेदी सुरू झाली आहे.

हमीभावापेक्षा मिळतोय कमी दर

शासकीय खरेदीचा घोळ संपता संपत नसल्याने व उद्दिष्ट अतिशय कमी असल्याने शेतकऱ्यांनी खासगी बाजाराचा मार्ग स्वीकारला आहे. बाजार समितीत दररोज पाच ते सहा हजार पोत्यांची आवक होत असून सरासरी सात हजार ३२५ रुपये दर मिळत आहे. हमीदर सात हजार ५५० रुपये असून या दराच्या तुलनेत प्रति क्विंटल दोनशे रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com