Pulses Import: पहिल्या तिमाहीत तूर आयात दुप्पट; म्यानमारधून उडीद निर्यात वाढण्याचा अंदाज

Tur Import : देशात यंदा तूर आणि उडदाचे उत्पादन कमी झाल्याने भाव तेजीत आहेत. देशात तुटवडा असल्याने या दोन्ही कडधान्याची आयात पहिल्या तिमाहीत दुप्पट झाली.
Pulses Market
Pulses MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : देशात यंदा तूर आणि उडदाचे उत्पादन कमी झाल्याने भाव तेजीत आहेत. देशात तुटवडा असल्याने या दोन्ही कडधान्याची आयात पहिल्या तिमाहीत दुप्पट झाली. या आयातीसाठी भारताला चार हजार कोटींपेक्षा जास्त पैसा मोजावा लागला. आयात दुप्पट झाली तरी या तूर आणि उडदाचे भाव तेजीतच आहेत.

देशात मागील हंगामात तूर आणि उडदाचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे सरकारने या दोन्ही कडधान्याचे उत्पादन वाढीसाठी प्रयत्न सुरु केले. पण सरकारच्या प्रयत्नानंतरही देशातील लागवड आतापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा पिछाडीवरच असल्याचे दिसते. माॅन्सूनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच जून महिन्यात पावसाचे प्रमाण महाराष्ट्र आणि कर्नाटकात कमी पाऊस होता. यामुळे लागडीवर परिणाम झाला.

Pulses Market
Tur Crop : खामखेड येथे तूर पिकाची शेतीशाळा

देशात कडधान्याला चांगली मागणी आहे. दरही तेजीत आहेत. त्यामुळे आयातीला प्रोत्साहन मिळाले. सरकारने आयातीतील अडथळे दूर केले. परिणामी आयात अधिक सुलभ झाली. यामुळे एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत यंदा कडधान्य आयात जवळपास दुप्पट झाली. रुपायात सांगायचे झाले तर भारताने कडधान्य आयातीवर या तीन महिन्यांमध्ये ४ हजार ११७ कोटी रुपये खर्च केले. तर मागील हंगामात याच काळातील आयातीवरील खर्च १ हजार ७२५ रुपये खर्च झाले होते.

Pulses Market
Onion Subsidy : कांदा अनुदानाचे ४० हजारांवर अर्ज अपात्र

फक्त जून महिन्याचा विचार करता आयातीत तिप्पट वाढ झाल्याचे दिसते. देशातील भाव उच्च पातळीवर स्थिरावल्याने आयात वाढल्याचे जाणकारांनी सांगितले. तूर आयातीचा विचार करता एप्रिल ते जून या काळातील तूर आयात जवळपास दीड लाख टनांवर पोचली. मागीलवर्षी याच काळातील आयात ७६ हजार टनांवर होती. तर उडीद आयात गेल्यावर्षीच्या ७६ हजार टनांवरून यंदा १ लाख टनांवर पोचली.

मागील तीन महिन्यांमध्ये म्यानमारमधून उडीद निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली. कारण म्यानमारमध्ये उडादाचा स्टाॅक चांगला आहे. म्यानमारमधील उद्योगांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरीचा ५० हजार टनांचा स्टाॅक आहे. तर उडदाचा चार ते साडेचार लाख टनांचा स्टाॅक आहे. हा माल म्यानमारमधून नव्या हंगामातील तूर आणि उडीद बाजारात येण्याच्या आधी निर्यात होऊ शकतो, असेही येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com