Tomato Varieties : खरीप हंगामासाठी टोमॅटोचे सुधारित वाण

Team Agrowon

लागवड

खरीप हंगामात टोमॅटो लागवड ही मे ते जून या कालावधीत रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करून जून ते जुलै महिन्यात पुनर्लागवड केली जाते.

Tomato Varieties | Agrowon

दर्जेदार उत्पादनासाठी

जमीन, बियाणे, रोपवाटिका, पुनर्लागवड, सिंचन आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केल्यास दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.

Tomato Varieties | Agrowon

विविध वाण

टोमॅटोमध्ये सरळ व संकरित प्रकारात विविध वाण उपलब्ध आहेत.

Tomato Varieties | Agrowon

धनश्री

हा वाण मध्यम वाढणारा असून जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयोगी आहे. या वाणापासून हेक्टरी ४५ ते ५० टन उत्पादन मिळते.

Tomato Varieties | Agrowon

भाग्यश्री

हा वाण मर्यादित वाढणारा असून जवळच्या ते मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी उपयोगी आहे. या वाणापासून हेक्टरी ४० ते ४५ टन उत्पादन मिळते.

Tomato Varieties | Agrowon

फुले राजा

हा वाण सतत वाढणारा असून लांबच्या बाजारपेठेसाठी उपयोगी आहे. या वाणापासून हेक्टरी ५५ ते ६० टन उत्पादन मिळत.े

Tomato Varieties | Agrowon

फुले केसरी

हा वाण मर्यादित वाढणारा असून फळांचा रंग केसरी आहे. या वाणापासून हेक्टरी ५५ ते ५७ टन उत्पादन मिळते.

Tomato Varieties | Agrowon