Monsoon : देशात यंदा पाऊस सामान्यच, पण सरकारचा ३ हजार ३२० लाख टन अन्नधान्याच्या उत्पादनाचा अंदाज

देशात यंदा मान्सूच्या पाऊस (monsoon forecast 2023) सरासरीपेक्षा कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, दुसरीकडे केंद्र सरकारने ३ हजार ३२० लाख टन अन्नधान्याच्या उत्पादनाचे (Grain Production) लक्ष ठेवले आहे.
यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा अंदाज
यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा अंदाजagrowon

Foodgrain Production Target 2023-24 : केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०२३-२४ या वर्षासाठी विक्रमी ३ हजार ३२० लाख टन (332 million tonnes) अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे मागील वर्षी ३ हजार ३२० लाख टन उत्पादन झाले होते.

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बुधवारी खरीप मोहिम २०२३-२४ साठी कृषी विषयक राष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्लीत उद्घाटन केले. या परिषदेचा उद्देश मागील पीक हंगामातील पीक कामगिरीचा आढावा घेत त्याचे मूल्यांकन केले. तसेच खरीप हंगामासाठी पीकनिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.

यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा अंदाज
Monsoon Update : देशात यंदा पाऊस बेताचाच

सध्या देशभर अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच यावर्षीच्या मोसमी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने नुकताच वर्तविला आहे. त्यानुसार देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी कडधान्य उत्पादनाचे २७८.१ लाख टन उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. ते वाढवून यंदा २९२.४ लाख टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर २०२३-२४ मध्ये तेलबियांचे उत्पादन ४०० लाख टनांवरून वाढवून ४४० लाख टन करण्यात आले आहे. बाजरीचे उत्पादन २०२२-२३ मध्ये १५९.१ लाख टनांवरून १७० लाख टनपर्यंत ठेवण्यात आले आहे.

आंतर-पीक, पीक पद्धतीत बदल करून पीक लागवड क्षेत्र वाढवण्यात येईल. तसेच कमी उत्पादन देणार्‍या प्रदेशात योग्य पीक पद्धतींचा अवलंब करून उत्पादकता वाढवण्याचे सरकारचे धोरण आहे. २०२२-२३ च्या हंगामात तांदूळ, मका, हरभरा, कडधान्ये, मोहरी, तेलबिया आणि उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा यांनी सांगितले की , देशाने २०१५-१६ पासून अन्नधान्य उत्पादनात वाढता कल कायम ठेवला आहे. सरकारने पीक आणि पशुधन उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांना हमीभाव (MSP) देण्याची खात्री करणे, पीक विविधतेला चालना देणे आणि कर्जाची उपलब्धता वाढवणे, यांत्रिकीकरण सुलभ करणे आणि फलोत्पादन आणि सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी केंद्रीत हस्तक्षेप केले आहेत.

यंदा हंगामात सोयाबीनच्या दरात तेजीचा अंदाज
Monsoon Rain : पावसाच्या अंदाजासाठी ‘एल निनो‘ घटक महत्त्वाचा...

परिणामी, २०२१-२२ मध्ये कृषी निर्यातीत ऐतिहासिक वाढ झाल्याचे ते म्हणाले. मागील वर्ष २०२०-२१ च्या तुलनेत, कृषी आणि संबंधित निर्यात ४ हजार १८६ कोटी USD वरून २०२१-२२ मध्ये ५ हजार २४ कोटी USD पर्यंत वाढली आहे, १९.९९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिषदेदरम्यान खत पुरवठ्याच्या स्थितीबाबतही सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

पावसावर अवलंबून असलेली खरीप पिके साधारणपणे मे-जुलैमध्ये पेरली जातात आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जातात. तांदूळ, मका आणि सोयाबीन ही काही खरीप पिके आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com