Cotton Rate : कापड उत्पादन ८ टक्क्यांनी वाढले

देशात मागील पाच वर्षांमध्ये कापसाचा वापर वाढलाय. वाढत्या लोकसंख्येमुळं कपड्यांनाही मागणी वाढली. २०२१ मध्ये देशात ४५.५ दशलक्ष मीटर कापड निर्मिती झाली होती.
Textile Production
Textile ProductionAgrowon
Published on
Updated on

पुणेः सध्या कापड उद्योगाकडून (Textile Industry) सुताला उठाव (Yarn Demand) नसल्यानं कापूस दरातील (Cotton Rate) तेजी नरमली. त्यातच जगात पाॅलिस्टरच्या कपड्यांना मागणी (Polyester Demand) वाढतेय. मात्र भारतात काॅटनच्या कपड्यांना पसंती मिळतेय. त्यातही साडी निर्मितीसाठी (Saree Production) कापसाचा वापर (Cotton Consumption)वाढलाय. भारतातील साडी मार्केट वर्षाला ८ टक्क्यांनी वाढतयं. ही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

देशात मागील पाच वर्षांमध्ये कापसाचा वापर वाढलाय. वाढत्या लोकसंख्येमुळं कपड्यांनाही मागणी वाढली. २०२१ मध्ये देशात ४५.५ दशलक्ष मीटर कापड निर्मिती झाली होती. यापैकी जवळपास १९.२ दशलक्ष मीटर साड्यांचा समावेश होता. म्हणजेच मागील वर्षात देशातील एकूण कापड निर्मितीपैकी तब्बल ४२ टक्के कापड साडी निर्मितीसाठी वापरलं गेलं. २०१८ पासून साडी मार्केट वर्षाला ८ टक्क्यांनी वाढतंय.

Textile Production
Cotton Rate : कापसाचे मुहूर्ताचे दर नऊ हजार रुपये राहणार

ही वाढ इतर कपड्यांच्या तुलनेत कमी असली तरी प्रमाण जास्त आहे. काही प्रकारच्या कपड्यांची मागणी दोनअंकी झाली. यात जिन्सच्या कपड्यांची मागणी जवळपास १४ टक्क्यांनी वाढली. तर आंतरवस्त्रे साडेतेरा टक्के, टी शर्ट १३ टक्के, फ्राॅक १२ टक्के आणि सलवार, कमीजचा वापर १० टक्क्यांनी वाढलाय.

जागतिक साडी मार्केटचा विचार केल्यास २०१६ मध्ये जवळजवळ १४ हजार दशलक्ष मीटर साड्यांची निर्मिती झाली होती. तर २०२३ पर्यंत हे मार्केट २३ हजार दशलक्ष मीटरपर्यंत वाढेल, असा अंदाज कापड उद्योगातून व्यक्त होतोय.

Textile Production
Cotton Rate : कापसात यंदाही तेजी राहणार का?

भारताचं कापड मार्केट सतत वाढतचं आहे. देशात २०१८ मध्ये ३६ हजार दशलक्ष मीटर कापड उत्पादन झालं होतं. तर २०२३ पर्यंत देशातील कापड उत्पादन ५४ दशलक्ष मीटरवर पोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच भारताचं कापड मार्केट वार्षिक साडेआठ टक्क्याने वाढतंय.

याचा फायदा कापसालाही मिळत आहे. देशात कापसाचा वापर वाढतोय. मात्र नैसर्गिक संकट आणि कीड-रोगामुळं उत्पादन मात्र स्थिर आहे किंवा कमी होतंय. त्यामुळं सहाजिकच कापूस आणि कापसापासून निर्मित सूत महाग होत आहे. परिणामी देशातही पाॅलिस्टर आणि सिंथेटीक कापडाचं प्रमाणं वाढेल, अशी भीती व्यक्त केली जातेय.

जगात पाॅलिस्टरच्या कड्यांना जास्त मागणी आहे. मात्र भारतात वातावरण उष्ण असल्यानं काॅटनच्या कपड्यांना अधिक पसंती असते. ग्राहकांची ही पसंती टिकवून ठेवायची असल्यास कापसाचं उत्पादन वाढवून रास्त दरात कापड मिळणं गरजेच आहे.

भारत हा उष्णकटीबंधीय देश असल्यानं कापसापासून निर्मित कपड्यांना जास्त मागणी असते. मागील १५ ते २० वर्षांपासून साड्यांचा ट्रेंड बदलला. वर्षागणिक साड्यांची मागणी आणि उत्पादन वाढतच आहे. यामुळं कापसाचा वापरही वाढला. देशातील कापड बाजाराचा विचार केला तर ७५ टक्के कापसापासून तर २५ टक्के पाॅलिस्टर आणि सिंथेटीक कापडाचं उत्पादन होतं.
सतीश कोष्टी, कापड उद्योजक, इचलकरंजी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com