Tur market : तूर बाजाराची स्थिती काय?

Anil Jadhao 

देशातील बाजारात सध्या तुरीची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे तुरीचे दर तेजीत आहेत. आता आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर बाजारात आली. त्यामुळे सरकारने आयात तूर खरेदीचा निर्णय घेतला.

मात्र आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीला देशात जास्त उठाव मिळत नाही. तसेच या तुरीवर प्रक्रिया करणे आवघड जाते. प्रक्रिया करताना माल जास्त वाया जातो. त्यामुळे या तुरीचे दरही जास्त असतात.

देशातील तूर उपलब्धतेचा बाजारावर सध्या परिणाम होत आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील बाजारात तुरीचे दर मागील काही महिन्यांपासून स्थिर आहेत.

सध्या देशात तुरीला प्रतिक्विंटल ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. महाराष्ट्रातील दर ७ हजार १०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. तर कर्नाटकातील दरही ६ हजार ८०० ते ७ हजार ९०० रुपयांवर स्थिर आहे.

लाल तूर सध्या ७ हजार ते ७ हजार ८०० रुपयाने विकली जात आहे. तर लेमन तुरीचा भाव ७ हजार ३०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.

यंदा तुरीचं उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तुरीच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज प्रक्रियादारांनी व्यक्त केलाय.

cta image