फ्यूचर्स किमती ः सप्ताह ९ ते १५ सप्टेंबर २०२३
Agriculture News : हळदीच्या किमतीतील तेजी आता कमी होऊन किमती घसरू लागल्या आहेत. या सप्ताहात टोमॅटोची व कांद्याची आवक १२ टक्क्यांनी वाढली. त्यामुळे या दोन्ही पिकांच्या किमती घसरल्या. अर्थात, टोमॅटोवर त्याचा परिणाम अधिक झाला. तुरीच्या किमतीतील वाढ टिकून आहे. १५ सप्टेंबर रोजी संपलेल्या सप्ताहात किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात ०.२ टक्क्याने वाढून रु. ६१,२६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.५ टक्क्याने वाढून रु. ६१,५६० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स भाव ०.८ टक्क्याने वाढून रु. ६०,८४० वर आले आहेत. जानेवारी फ्यूचर्स रु. ६१,३६० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा ०.३ टक्क्याने कमी आहेत. कापसाचे भाव वाढण्याचा कल आहे. आवक कमी झाली आहे.
कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,५३६ वर आले होते. या सप्ताहात ते १.१ टक्क्याने वाढून रु. १,५५३ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,५२० वर आले आहेत. एप्रिल फ्यूचर्स रु. १,५५२ वर आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ०.१ टक्क्याने कमी आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत. कपाशीचे फ्यूचर्स भाव हमीभावापेक्षा अधिक आहेत.
मका
NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात रु. २,०८० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. २,०८० वर स्थिर आहेत. फ्यूचर्स (ऑक्टोबर डिलिव्हरी) किमती रु. २,०९५ वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. २,११९ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहे.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट (निजामाबाद, सांगली) किमती गेल्या सप्ताहात रु. १४,०३३ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुन्हा २.९ टक्क्यांनी घसरून रु. १३,६२० वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. १५,५९० वर आल्या आहेत. डिसेंबर फ्यूचर्स किमती रु. १५,५२६ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १८.८ टक्क्यांनी जास्त आहेत. हळदीमधील तेजी कमी झाली आहे. किमती कमी होत आहेत.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ०.४ टक्क्याने घसरून रु. ६,१२५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्याने घसरून रु. ६,०२५ वर आल्या आहेत. हरभऱ्याचा हमीभाव रु. ५,३३५ आहे. गेल्या तीन महिन्यांत हरभऱ्याचे भाव सातत्याने वाढत होते; मात्र १ सप्टेंबरपासून ते घसरत आहेत.
मूग
मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात ७.७ टक्क्यांनी वाढून रु. ९,४७५ वर आली होती. या सप्ताहात मात्र ती ८.४ टक्क्यांनी घसरून रु. ८,६७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ५,१२५ वर आली होती. या सप्ताहात ती १ टक्क्याने घसरून रु. ५,०७५ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.
तूर
तुरीची स्पॉट किमत (अकोला) गेल्या सप्ताहात ३.२ टक्क्यांनी वाढून रु. १०,३२६ वर आली होती. या सप्ताहात ती पुनः ३.९ टक्क्यांनी वाढून रु. १०,७२५ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० जाहीर झाला आहे. तुरीच्या भावात तेजी आहे. आवक कमी आहे. पुढील वर्षाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
: arun.cqr@gmail.com
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.