Turmeric Market : पाच महिन्यांत सव्वादोन लाख क्विंटल हळदीची आवक

Turmeric Arrival : हळदीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेड बाजार समिती अंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात मागील जून ते ऑगस्ट या पाच महिन्यांत दोन लाख २४ हजार ६३५ क्विंटल हळदीची आवक झाली.
Turmeric Market
Turmeric Market Agrowon
Published on
Updated on

Nanded News : हळदीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेड बाजार समिती अंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात मागील जून ते ऑगस्ट या पाच महिन्यांत दोन लाख २४ हजार ६३५ क्विंटल हळदीची आवक झाली. यास कमाल दर २७ हजार रुपये, किमान ८ हजार ५९५ रुपये तर सरासरी १३ हजार ६३९ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

राज्यात हळदीची सर्वाधिक आवक होणाऱ्या सांगली, वसमत, हिंगोली बाजारपेठेप्रमाणेच नांदेड बाजारही हळदीची प्रमुख बाजार पेठ म्हणून उदयाला आला आहे. नांदेडला तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेशातून हळद खरेदीसाठी व्यापारी येतात.

यामुळे येथील बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात हळदीला चांगले दर मिळू लागले आहेत. यामुळे या भागातील शेतकरीही हळदीच्या लागवडीकडे वळले आहेत.

Turmeric Market
Turmeric Market : हळदीचे भाव काही दिवसांपासून का स्थिरावले?

मागील वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे हळदीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कंदसडीमुळे उत्पादकतेत घट आली होती. तसेच हळद काढणी दरम्यान यंदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी चालू हंगामात हळदीची लागवड आटोपती घेतली होती.

Turmeric Market
Turmeric Research : हळद संशोधन केंद्राद्वारे शेतकऱ्यांच्या प्रगतीला दिशा मिळेल

दरम्यान, यंदा बाजारात नवीन हळदीची आवक सुरु झाल्यानंतर दर दबावात होते. सरासरी ६ हजार ते ६ हजार ६०० रुपये दर एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांना मिळाला. परंतु यानंतर जुलै व ऑगस्टमध्ये मात्र हळदीच्या दराने उसळी घेतली.

या काळात हळदीला कमाल २७ हजार रुपये, किमान आठ हजार ५९५ रुपये तर सरासरी १३ हजार ६३९ रुपये दर मिळाला. या पाच महिन्यांत नांदेड बाजार समितीच्या नवा मोंढा बाजारात दोन लाख २४ हजार ६३५ क्विंटल हळदीची आवक झाल्याची माहिती बाजार समितीतील सूत्रांनी दिली.

दर टिकून राहण्याची अपेक्षा

सध्या असलेला दर टिकून राहिल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. हळदीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पुढील वर्षीही हळदीला चांगला भाव मिळाला तर दोन पैसे शिल्लक राहतील, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com