Chana Market : अकोल्यात हरभऱ्याला सरासरी ६१०० रुपयांचा दर

Chana Rate : हरभऱ्याचा दर गेल्या काही दिवसांत सरासरी ६००० ते ६१०० दरम्यान स्थिरावलेला असल्याचे दिसून येत आहे.
Chana Market
Chana MarketAgrowon

Akola News : हरभऱ्याचा दर गेल्या काही दिवसांत सरासरी ६००० ते ६१०० दरम्यान स्थिरावलेला असल्याचे दिसून येत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला किमान ५४६० व कमाल ६५०० पर्यंत दर मिळतो आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची यापूर्वी मोठ्या प्रमाणात आवक सुरू होती. सध्या पेरण्यांचा हंगाम सुरू झालेला असल्याने बाजारातील आवकेवर त्याचा विपरित परिणाम दिसून आला आहे. सध्या आवक ३०० क्विंटलपर्यंत होत आहे. सोमवारी (ता. १) बाजारात ३७० क्विंटलची आवक झाली होती.

Chana Market
Chana Import : ऑस्ट्रेलियातून ११ लाख टन हरभरा आयातीची शक्यता

रब्बीत या भागात सर्वाधिक हरभऱ्याचे पीक घेतले जाते. हरभऱ्याची उत्पादकताही चांगली आहे. विशेषतः कोरडवाहू पट्ट्यातील हरभऱ्याला विशिष्ट चव व गुणधर्मांमुळे चांगली मागणी असते. अकोला, अकोट, मूर्तीजापूर या बाजार समित्यांमध्ये खारपाण पट्ट्यातील हरभरा सर्वाधिक विक्री होत असतो.

Chana Market
Tur Chana Stock : तूर, हरभऱ्यावर साठा मर्यादा लागू

अकोला ही मध्यवर्ती बाजारपेठ असून येथे खरेदीदारांची संख्याही मोठी आहे. हरभऱ्याची खरेदी-विक्री अधिक होत असल्याने साहजिकच शेतकरी अकोला बाजाराला पसंती देतात. या हंगामात हरभऱ्याची भरघोस खरेदी-विक्री झाली आहे. सध्या आवक कमी असली तरी दर ६१०० पर्यंत स्थिरावलेले आहेत.

तुरीचा सरासरी दर ११ हजारांवर

अकोला बाजार समितीत हरभऱ्या पाठोपाठ तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. पेरण्यांमुळे तुरीची आवकसुद्धा काहीशी कमी झाली आहे. दर मात्र, येथे सातत्याने चांगला मिळत आला आहे. सध्या बाजारात तूर किमान ९७०० पासून विकली जात आहे. तुरीचा कमाल दर १२२०५ रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे सरासरी दर हा ११२०० रुपयांवर मिळत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com